CM Eknath Shinde | अहमदनगरचं नामांतर आता अहिल्यानगर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा (व्हिडिओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे आज अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी अहमदनगर जिल्ह्याचं (Ahmednagar Rrenamed) नाव अहिल्यादेवी होळकर नगर (Ahilya Devi Holkar Nagar) असं व्हावं ही इच्छा आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लगेच त्यांच्या भाषणात अहमदनगरचं नाव बदलून आहिल्यादेवी होळकर नगर असं करणार असल्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, अहिल्यादेवींचं माहेरचं आडनाव शिंदे आहे आणि मी पण शिंदेच आहे. आज येथे रामभाऊ शिंदे (Rambhau Shinde) आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मागणी मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझीही तीच इच्छा आहे. तसेच तुमच्या सर्वांच्या इच्छेखातर अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवी होळकर नगर असं करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांचे नाव हिमालयाएवढे आहे. अहिल्यादेवी यांनी शेतकरी आणि कष्टकरी यांच्यासाठी खूप काही केलं. अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे. आमच्या सरकारच्या काळात अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय होणार असल्याने हे आमचं भाग्य आहे. आजच्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आम्हाला भाग्य मिळाले. ज्यांनी इथे येऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांना वीस दिवसांत सत्तेतून घालवून टाकण्याचे काम आम्ही केल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

 

Advt.

अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 रोजी मलिक अहमद बादशहाने (Malik Ahmad Badshah) केली.
नुकतीच अहमदनगर शहराच्या स्थापनेला 532 वर्ष पूर्ण झाली आहे.
मलिक अहमद निजामशहाच्या नावावरुनच अहमदनगर हे नाव पडले आहे.
अहमदनगरचे नाव राजामाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरुन करण्याची मागणी केली जात होती.

 

Web Title :  CM Eknath Shinde | cm eknath shinde big announcement ahmednagar will be named ahilyadevi holkar nagar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा