CM Eknath Shinde | शिंदेंच्या मंत्रिमंडळात नसणार्‍यांना खर्‍या अर्थाने ‘अच्छे दिवस’; ‘त्या’ आमदाराचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) आज मंत्रिमंडळ विस्तार करताच चांगलाच गोंधळ उडाला आहे. ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत, अशा लोकांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याने विरोधकांसह स्वकीय सुद्धा शिंदे- फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी मंत्रिमंडळात असणार्‍या सदस्यांऐवजी जे मंत्रिमंडळात नाहीत अशा आमदारांना अच्छे दिवस आल्याचे म्हटले आहे. मिटकरी यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. (CM Eknath Shinde)

 

मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवताना मिटकरी यांनी शिंदे सरकारचा उल्लेख ‘ओढून ताणून स्थापन केलेलं औट घटकेचं सरकार’ असा केला. मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये खोचक टोला लगावत लिहिले आहे की, हिंदुत्वासाठी औट घटकेचं ओढून तोडून स्थापन झालेल्या शिंदे सरकारमधील प्रथम श्रेणी कॅबिनेट मंत्र्यांना कट्टर धर्म रक्षणाच्या शुभेच्छा. ज्यांना यात स्थान मिळालं नाही त्यांनी त्यांचे खर्‍या अर्थाने ‘अच्छे दिवस’ आलेले आहेत असे समजावे.

 

टीईटी परिक्षेतील घोटाळ्यामुळे चर्चेत आलेले आमदार अब्दुल सत्तार यांच्याबरोबरच पूजा चव्हाण प्रकरणामुळे भाजपाने केलेल्या विरोधामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतल्याने विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. इतकेच नव्हे तर भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जाहीरपणे संजय राठोड यांच्या निवडीला विरोध दर्शवला आहे. पूजा चव्हाण प्रकरणातील प्रमुख संजय राठोड यांना मंत्रिपद देणे हे दुर्दैवी आहे, असे वाघ यांनी म्हटले आहे. (CM Eknath Shinde)

 

आज राजभवनमध्ये पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे,
अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील या 9 जणांनी शपथ घेतली.
तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण,
विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांनी शपथ घेतली.

 

Web Title : –  CM Eknath Shinde | cm eknath shinde cabinet expansion ncp mla amol mitkari reacts

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा