×
Homeताज्या बातम्याCM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांचे छगन भुजबळांना प्रत्युत्तर, म्हणाले - कुठलेही फोटो...

CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांचे छगन भुजबळांना प्रत्युत्तर, म्हणाले – कुठलेही फोटो काढले जाणार नाहीत, जे लोकांना…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | शाळेत सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), महात्मा फुले (Mahatma Phule), छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj), बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar), कर्मवीर भाऊराव पाटलांचा (Karmveer Bhaurao Patil) फोटो लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिलं नाही. ज्यांनी शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर ते फक्त 3 टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची? असे वक्तव्य काल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मुंबईत एका कार्यक्रमात केले होते. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, कुठलेही फोटो काढले जाणार नाहीत. कुणाला काहीही वाटेल. त्यांना वाटेल ते आम्ही करणार नाही. जे लोकांना वाटते तेच आम्ही करणार आहोत. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, या स्वामीनारायण मंदिराच्या भूमिपूजनालाही मी आलो होतो. मी मुख्यमंत्री असताना मला संधी मिळाली हा योगायोग आहे. त्यासाठी मी खूप समाधानी आहे. तीन वर्षात हे भव्यदिव्य मंदीर निर्माण झाले. हे एक मोठे काम स्वानारायण मंदिराबाबत झाले आहे.

पीएफआयवर (PFI) बोलताना मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणाले, पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणारे देशासाठी धोकादायक आहेत.
म्हणून अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे. अशा घोषणा देणार्‍यांना या देशात राहण्याचाच अधिकार नाही.
त्यामुळे पीएफआयवर जी बंदी घातली ती योग्य आहे.
या राज्यात, देशात कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणं खपवून घेतलं जाणार नाही.
त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे.

 

शिंदे म्हणाले, केंद्राचा आणि राज्याचा गृहविभाग दोघांचेही यावर बारीक लक्ष आहे.
या देशात राष्ट्रद्रोही, देशद्रोही विचार कुणालाही पसरवता येणार नाही आणि पसरवू दिले जाणार नाहीत.

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde comment on chhagan bhujbal statement on saraswati photo in school Marathi News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; 1 लाख 62 हजारांची अफुची बोंडे (चुरा) जप्त

District Planning Committee (DPC) Pune | अजित पवारांना धक्का? पुणे जिल्हा नियोजन समितीवरील 18 सदस्यांचे पद रद्द

Pankaja Munde | ‘…तर मोदीही मला संपवू शकत नाही’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडे म्हणाले…

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News