CM Eknath Shinde | मिलिंद नार्वेकर सुद्धा शिंदे गटात जाणार? एकनाथ शिंदेंनी दिले उत्तर, म्हणाले – माझं वागणं पोटात एक, आणि ओठात एक नसतं!

मुंबई : CM Eknath Shinde | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे स्वीय सहायक असलेले मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) शिंदे गटात (Shinde Group) येणार असल्याचे वक्तव्य करून मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीच आता प्रतिक्रिया दिली आहे. माझं वागणं पोटात एक आणि ओठात एक असं नसतं, असे म्हणत शिंदे यांनी स्पष्टच शब्दात माहिती दिली.

गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री शिंदे हसत-हसत म्हणाले, माझं वागणं पोटात एक आणि ओठात एक असं नसतं. जे असतं ते खुल्या दिल्याने मी आपल्याला सांगतो. लपवून ठेवण्याचा माझा स्वभाव नाही, हे आपण मीडियातील सर्वजण जाणता. पण मिलिंद नार्वेकर यांच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. मुख्यमंत्री म्हणून मला अनेक लोक भेटायला येत असतात. त्यांच्या कामानिमित्त ते माझी भेट घेत असतात. पण त्यांच्या प्रवेशाबाबत खरंच माझ्याकडे सध्या तरी माहिती नाही.

गुलाबराव पाटील यांनी म्हटले होते की, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे सेवक चंपासिंग थापा (Champasing Thapa) यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात येत आहेत. आम्ही 50 खोके घेतले असतील, पण ज्या चंपासिंह थापाने बाळासाहेबांची आयुष्यभर सेवा केली. त्यांना अग्नीडाग दिला, तो थापा आमच्याकडे आला, आता मिलिंद नार्वेकर देखील आमच्याकडे येत आहेत.

शिवसेनेत (Shivsena) बंडखोरी झाल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनाच उद्धव ठाकरे यांनी समेट घडवण्यासाठी शिंदेंच्या भेटीला सुरतमध्ये पाठवले होते.
मात्र त्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर फारसे सक्रिय नसल्याचे सांगितले जाते आहे.
गेल्या दोन महिन्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)
आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटी घेतल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले होते.
नार्वेकरांच्या या हालचाली शिवसेनला धक्का देणार्‍या आहेत.

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde comment on uddhav thackeray pa milind narvekar political movement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | प्रेमात झाला धोका, ट्रेनवर चढून ओव्हरहेड वायर धरली; पुणे स्टेशनमधील धक्कादायक प्रकार

Amol Kolhe | राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे गृहमंत्री अमित शहांना भेटले, राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 5 लाखाचा भेसळयुक्त गुळ व साखर जप्त