CM Eknath Shinde | ‘काम करण्याची चर्चा होते, अन् बिनकामाचे मोर्चा काढतात’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खोचक टोला (व्हिडिओ)

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या पाच महिन्यापूर्वी महाराष्ट्र अभूतपूर्व राजकीय उलथापालथ (Maharashtra Politics) झाली. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर राज्यात शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपचे सरकार (BJP Government) स्थापन झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांची रत्नागिरीत प्रमोद महाजन संकुलात सभा पार पडली. यावेळी शिंदे गटात अनेक नगरसेवकांनी प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

 

बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) हिंदुत्वाचे विचार आणि त्यांची भूमिक आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केला. शिवसेना-भाजप युती (Shiv Sena-BJP Alliance) म्हणून आपण एकत्र निवडणुका लढवल्या. बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचे फोटो लावून मतं मागितली. लोकांनी पूर्ण बहुमत युतीला दिलं. त्यामुळे लोकांच्या मनातलं आणि बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं. मग आमचं चुकलं काय, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) विचारला.

आरोप प्रत्यारोप करण्याची स्पर्धा लागली आहे. त्याला आम्ही कामातून उत्तर देऊ.
पण, ज्यांना खोके माहिती आहेत, तेच खोक्याची भाषा करतात. खोके कुठून कुठे जातात हे सर्वांना माहिती आहे.
जनता सुज्ञ आहे. 50 खोके नाहीतर 750 खोके आम्ही रत्नागिरीच्या विकासासाठी दिले. आम्ही घरी खोके ठेवणारे नाहीत.
आम्ही घेणारे नाहीत, देणारे आहोत, असे शिंदे म्हणाले.

 

महाविकास आघाडीकडून उद्या मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे.
यावरुनही एकनाथ शिंदेंनी खोचक टोला लगावला आहे. आपण धडाकेबाज निर्णय घेत आहोत.
पण, जे रस्त्यावर येत आहेत, ते मोर्चा काढतील. आपण काम करणारे आहोत,
काम करणाऱ्यांचीच चर्चा होते आणि बिनकामाचे मोर्चा काढतात, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde criticize mahavikas aghadhi mahamorcha know what they said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune CP Retesh Kumaarr | रितेश कुमार यांनी स्विकारली पुणे पोलिस आयुक्तपदाची सूत्रे (VIDEO)

Sanjay Raut | “कुणालाही हे मान्य नाही की राजभवनात बसून…”, संजय राऊतांची राज्यपालांवर टीका

Governor Appointed MLA | राज्यपाल नियुक्त आमदारांची सुनावणी लांबणीवर, विधानपरिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट