CM Eknath Shinde | ‘…म्हणून विरोधकांना त्रास होत आहे’, नोटबंदीवरुन एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) दोन हजार रुपयांची नोट वितरणातून काढून टाकली. यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भाजप (BJP) समर्थक या निर्णयाचं स्वागत करत आहेत, तर विरोधक या निर्णयाने नोटबंदीचा (Demonetisation) निर्णय फसल्याची टीका करत आहेत. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांकडे नोटा जास्तीच्या असतील म्हणून त्यांना त्रास होत आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लगावला.

शिवसेना पालघर (Shiv Sena Palghar) जिल्हा आणि आधार प्रतिष्ठान, बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नोटबंदीवरुन विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नोटबंदी हा निर्णय आरबीआयचा (RBI) असून तो काय सरकारचा किंवा पक्षाचा नाही. त्यामुळे विरोधकांनी उगाचच यावर चर्चा करु नये. नोटाबंदी साठी आरबीआयने मुदत दिलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कोणताही त्रास होणार नाही. विरोधकांकडे जास्तीच्या नोटा असतील म्हणून त्यांना त्रास होतो की काय असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

 

सामुहिक सोहळ्याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले,
समाजात प्रत्येकाला थाटामाटात लग्न करणे आर्थिकदृष्ट्या जमतेच असे नाही.
ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते अशा गरीब कुटूंबाना सामुदायिक विवाह सोहळ्यातून सहकार्य मिळते.
231 वधू वरांच्या आयुष्यातील विवाह हा अत्यंत महत्वाचा टप्पा आज संपन्न होतो आहे याचे समाधान वाटत आहे.

 

 

Web Title :  CM Eknath Shinde | cm eknath shinde criticized opposition leaders over rs 2000 note withdrawn

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा