Cm Eknath Shinde | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्मुला ठरला?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Cm Eknath Shinde | राज्यात शिंदे-फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले पण अद्याप मंत्रिमंडळ अस्तित्वात आले नसल्याने राज्याचा कारभार स्तब्ध झाल्याचे जाणवत आहे. शिवाय, यावरून विरोधी पक्षही भाजपा आणि शिंदे गटावर टीका करत आहे. मात्र आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंबंधीत एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये अनेक बैठका पार पडल्या आहेत. आता मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. (Cm Eknath Shinde)

 

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटाला जास्त मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिपद वाटपात 50-50 समीकरण आखण्यात आल्याचे समजते. यात एकनाथ शिंदे यांना 17 ते 18 मंत्रीपदे मिळू शकतात. तसेच भाजपला 25 ते 26 मंत्रीपदे मिळतील. तसेच अपक्ष आमदारांना आपापल्या कोट्यातून मंत्री मंडळात स्थान देण्यात येणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी म्हटले आहे.

 

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, सर्व ठरले आहे. काळजी करू नका, सरकारचे काम खूप मोठ्या वेगाने सुरू आहे. एका महिन्यात सरकारने अनेक महत्त्वकांक्षी निर्णय घेतले आहेत. शेतकरी, कष्टकरी आणि राज्यातील जनतेसाठी अनेक निर्णय घेतले आहेत.

शिंदे पुढे म्हणाले, सरकारचे काम युद्धपातीवर, किंबहुना जे लोकांना अपेक्षित आहे, तसे सुरू आहे.
त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेचा लाखोंच्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे. हे सर्वसामान्य माणसाचे सरकार आहे.

 

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारासाठी 2 किंवा 3 ऑगस्ट तारीख ठरल्याचे विश्वसनीय सूत्रांनी म्हटले आहे.
शिवसेनेने शिंदे गटाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर एक ऑगस्टला सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे.
त्यानंतरच याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. तर दुसरीकडे या निर्णयाचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नाही,
असे शिंदे गटाने म्हटले आहे. तर हे सरकार बेकायदेशीर असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.

Web Title :- Cm Eknath Shinde | cm eknath shinde devendra fadnanavis cabinet distribution formula was decided how many ministerial posts will be given to whom

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | सर्वांसाठी खुशखबर ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी ?

 

Maharashtra Political Crisis | बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा

 

Business News | लक्षात ठेवा ! 1 ऑगस्टपासून बदलतील तुमच्या बँकेशी संबंधीत ‘हे’ नियम, खिशावर होईल थेट परिणाम