CM Eknath Shinde | गुजरात विधानसभेच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. या मोजणीत भाजप गुजरातमध्ये आघाडीवर आहे, तर काँग्रेस हिमाचल प्रदेशमध्ये आघाडीवर आहे. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री शहा तसेच गुजरातच्या नागरिकांचे अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

मोदींची जादू देशात आणि विदेशात सगळीकडे आहे. आज आपल्याला जी- 20 चे अध्यक्षपद मिळाले आहे. ही आपल्या देशासाठी गौरवाची बाब आहे. गुजरातचा निकाल एक चांगला निकाल आला आहे. भाजपला गुजरातमध्ये 150 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम गुजरातमध्ये प्रचारासाठी गेले होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. त्यामुळे मी त्यांचेदेखील मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भरपूर काम करत आहोत. मुंबईचे सुशोभीकरण आम्ही केले आहे.
मुंबई स्वच्छ, सुंदर करून कायापालट झाला पाहिजे. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे.
मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे आगामी काळात आम्हाला गुजरातप्रमाणे यश मिळेल अशी आशा आहे, असे यावेळी शिंदे म्हणाले.

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde first reaction on gujrat elections result 2022

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SC On Property Dispute | सर्वोच्च न्यायालयाचा ज्येष्ठ नागरिकांना सल्ला; म्हातारपणाची काळजी घेतील, असे लिहून घ्या

Dharmendra | धर्मेंद्रनी सांगितला आयुष्यातील ‘तो’ किस्सा; ज्याची त्यांना आजही लाज वाटते