CM Eknath Shinde | दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानाला भेट दिली. तसेच यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) देखील भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधला आणि या भेटीवर भाष्य केले.

श्रद्धा वालकर या मुंबईतील तरुणीची हत्या (Shradha Walker Murder Case) दिल्लीत झाली आहे. ही खूप दुर्दैवी घटना आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. दिल्ली पोलीस (Delhi Police) या प्रकरणात तपास करत आहेत, असे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांशी झालेल्या भेटीवर बोलताना म्हंटले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या वास्तूत वास्तव्य केले होते. त्यामुळे येथे येऊन मनाला एक वेगळे समाधान लाभले आहे. ही पवित्र वास्तू पाहिल्यावर आणि बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू पाहिल्यावर मनाला शांतता आणि समाधान मिळाले. ही इमारत बाबासाहेबांच्या संकल्पनेतून उभी राहिली आहे. त्यांनी या ठिकाणी अनेक संघर्ष केले. हा ऐतिहासिक ठेवा आहे. त्यामुळे तो पाहण्याचा योग आला आणि मी धन्य झालो. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेली ही सदिच्छा भेट होती. यात कोणतेही राजकीय समीकरण नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) हे देशाचे भूषण होते. त्यामुळे मी या वास्तूला सदिच्छा भेट दिली. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. कृपया कोणीही यातून राजकीय अर्थ काढू नका.

प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत जाण्याची इच्छा आहे.
पण त्यांना महाविकास आघाडीतून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ते सध्या प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी आंबेडकरांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधान आले होते.
आंबेडकर – शिंदे युतीची चर्चा रंगली होती. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी वरील विधान केले आहे.
तसेच प्रकाश आंबेडकरांनी देखील आम्ही भाजप आणि शिंदे गटासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title :-  CM Eknath Shinde | cm eknath shinde first reaction on shraddha walkar murder in delhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | फुरसुंगी येथील रखवालदाराचा चोरीच्या उद्देशाने खून, गुन्हे शाखेकडून तिघांना अटक

Georgia Andriani | अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाने केले फोटोशूट, मांडीवरील लाल धनुष्याच्या टॅटूने वेधले लक्ष

Eknath Khadse | एकनाथ खडसेंना भाजपचा आणखी एक धक्का