CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादीला दणका ! 500 कोटींच्या कामांना ब्रेक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | सत्तेत येताच राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीला (NCP) पहिलाच दणका दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत विकासकामांसाठी 500 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती. या कामांना मुख्यमंत्री शिंदेे यांनी ब्रेक लावला आहे.
नाशिक जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी 500 कोटींचा निधी वापरण्यात येणार होता. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जिल्हा नियोजन समितीच्या 500 कोटींच्या कामांना ब्रेक लावला आहे. घाईघाईत कामांना मंजुरी कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी सवाल केला आहे.
दरम्यान, रस्ते दुरुस्ती- पुनर्बांधणी, बंधारे दुरुस्ती, तसेच, लोक प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त विकास कामांचे प्रस्ताव,
जिल्हा परिषद, जिल्हा विभागाकडे आलेले विकासकामांचे प्रस्ताव या सर्वांना विचारात घेऊन सर्व तालुक्यांना समान निधीचे वाटप करण्यात यावे आशा सूचना छगन भुजबळ यांनी केल्या होत्या.
मात्र शिंदे-भाजपचं सरकार आल्याने त्या कामांना ब्रेक लावला आहे.
Web Title :- CM Eknath Shinde | CM eknath shinde government freezes funds approved by ncp leader chhagan bhujbal question to nashik collector
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bullet Train | महाराष्ट्रात सरकार बदलल्याने ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाचा वेग वाढणार, अडथळे होणार दूर