मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी आज मुंबईत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्री येथे भेट घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी 2024 मध्ये मोदी सरकार (Modi Government) पुन्हा केंद्रात येणार नाही असा दावा केला होता. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) या भेटीवर टोला लगावला आहे. तसेच आगामी काळातील लोकसभा निवडणुकीत आतापर्यंतचे जे काही रेकॉर्ड आहेत, ते नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वात तुटतील असे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.
आता शेतकऱ्यांचा खरीप हंगाम (Farmers Kharip Hangam) सुरू होईल. या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जाऊ लागू नये म्हणून राज्य सरकारने (State Government) विविध नियोजनांसाठी राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीवर भाष्य केलं.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेतून लाईव्ह (२४/५/२०२३) https://t.co/cKLzkK9QFt
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 24, 2023
एकनाथ शिंदे म्हणाले, कोणीही कोणालाही भेटू शकतो. कुणालाही भेटल्याने निवडणूक जिंकता येत नाही. हुकुमशाही सुरु आहे की नाही जनता ठरवेल. देशाची प्रगती लोकांना दिसत आहे. जी 70 वर्षात देशाची प्रगती झाली नाही, ती गेल्या 8-9 वर्षात झाली, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आगामी काळातील लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Elections) आतापर्य़ंतचे जे काही रेकॉर्ड आहेत, ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात तुटतील, असाही दावा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.
बळीराजाला त्रास दिला तर कारवाई करणार
खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा हंगाम आहे. तो यशस्वी होण्याकरता सूचना देण्यात आल्या आहेत. बियाणे, खते, किटकनाशके मुबलक प्रमाणात आहेत. याचा तुटवडा भासू दिला जाणार नाही. बोगस बियाणे, बोगस खतं विकून बळीराजाला त्रास देण्याचं काम करेल त्याच्यावर कडक कारवाई करउ. कुठेही त्रुटी, उणीव भासता कामा नये. अल निनोमुळे (El Nino) पाऊस पुढे गेला तर काय करायचं यावर नियोजन करण्यात आलं आहे. दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून उपाय योजना केली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
आधी अंदाज चुकले असतील
हवामान खात्याचा (Meteorological Department) अंदाज चुकला तर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकतं.
अशा वेळी सरकार काय पावलं उचलणार? या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय उत्तर दिले.
ते म्हणाले, यावेळी अंदाज चुकणार नाही. आम्ही 11 महिन्यांपूर्वी सरकार स्थापन केले. त्यामुळे अंदाज चुकणार नाही.
याआधी अंदाज चुकले असतील, असं म्हणत ते गालातल्या गालात हसले.
Web Title : CM Eknath Shinde | cm eknath shinde has reacted to the meeting of uddhav thackeray and arvind kejriwal
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Delhi CM Arvind Kejriwal | ‘…तर 2024 मध्ये देशात मोदी सरकार येणार नाही’, अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं राजकारण (व्हिडिओ)
- Uddhav Thackeray | ‘आता असे दिवस येतील की केंद्रातच….’ उद्धव ठाकरेंचा गंभीर इशारा (व्हिडिओ)
- Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा;
क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमी संघाला विजेतेपद !!