CM Eknath Shinde | उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध एकनाथ शिंदेंची टोलेबाजी, अधिवेशन समारोपदिनी मुख्यमंत्र्यांची चौफेर फटकेबाजी (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सत्तेत असताना अडीच वर्षे बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा अन् बक्षीस मिळवा असे म्हणत आम्ही मुख्यमंत्रीच बदलून टाकला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांच्याविषयी (Uddhav Thackeray) टोलेबाजी करत विधिमंडळ अधिवेशनाच्या समारोप दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चौफेर फटकेबाजी केली. सत्तेच असताना तुम्ही अडीच वर्षांत विदर्भाच्या बाबतीत काय निर्णय घेतला. विदर्भातील शेतकरी मोटारीतून, विमानातून फिरला पाहिजे. येथील तालुक्यात लवकरच विमानतळ सुरू करतोय. मुख्यमंत्री कसा हेलिकॉप्टरने शेताच्या बांधावर जातोय असे म्हणून हिणवले गेले. त्यावर दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाणारा दाखवा आणि बक्षीस मिळवा असं म्हटले. मी तर म्हणतो मागचे मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडले हे दाखवा आणि बक्षीस मिळवा, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, कालचे जे निर्णय झाले त्याचे स्वागत अजितदादांकडून (Ajit Pawar) करण्यात येईल असं वाटलं होतं. मात्र तुम्ही आमच्या भाषणावर किती टाळ्या झाल्या आणि कोणी मारल्या हे मोजत होता. अजितदादाही अचंबित झाले असतील की एवढे मोठे निर्णय आम्ही घेऊ, आमचा कामाचा आवाका व वेग त्यांनी पाहिला आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

मी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोललो. ते म्हणाले की, असे उद्योग जात नसतात. त्यांना काय माहीत आहे की, सरकार बदलणार आहे. बाकीचे इंटरेस्ट ठेवले तर कोण येणार इथे, असा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही 70 हजार कोटी रुपयांच्या जवळपास प्रकल्प मंजूर केले आहेत. त्यातील 40 हजार कोटींचे प्रकल्प तर विदर्भात आहेत, असंही शिंदे म्हणाले.

 

ठाकरे यांचे नातू लिंबू टिंबूची भाषा करतात

शिंदे म्हणाले, सत्तेत असताना यांनी अडीच वर्षांत एकाच प्रकल्पाला मान्यता दिली. आम्ही आतापर्यंत 18 प्रकल्प मंजूर केले आहेत. तसेच चुका सुधारत गेल्यानंतर माणूसही सुधारतो. वर्षावर गेल्यानंतर तिथे पाटीभर लिंबं सापडली. प्रबोधनकार ठाकरेंचे नातू लिंबू टिंबूची भाषा करू लागले. काही काळानंतर आम्ही रेशीमबागेत गेलो म्हणून अनेकांनी हिणवलंसुद्धा. प्रबोधनकार बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांना पुढं नेऊन काम करायचं म्हणून आम्ही रेशीमबागेतच गेलो, गोविंदबागेत तर गेलो नाही.

शिवसेना राष्ट्रवादीमय झाली म्हणून…

शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) झाली म्हणून आम्ही बाहेर पडलो.
आमच्यावर रोज वेगवेगळे आरोप केले जातात. कोरोना काळात आम्ही जिवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून काम करत होतो आणि तुम्ही आम्हाला आवाहन देता. कोरोना काळात रस्त्यावर उतरून लोकांना दिलासा दिला, असेही शिंदे म्हणाले.

आजही मी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आहे. अधिवेशन सभागृहात जयंत पाटील
(Jayant Patil नाहीत, ते असायला पाहिजे होते. जयंत पाटील म्हणाले होते की, राष्ट्रवादीची शिवसेना झाली.
मुख्यमंत्री यांच्या लालसेपोटी ज्यांनी त्यांना तुरुंगात पाठविण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मांडीला मांडी लावून
कोण बसलं. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी विकले त्यांनी आम्हाला सांगायची गरज नाही.
हिऱ्याच्या पोटी गारगोटी, यापेक्षा मी काही जास्त बोलत नाही, असा टोलाही शेवटी त्यांनी लगावला.

Web Title :– CM Eknath Shinde | cm eknath shinde in maharashtra winter assembly session nagpur allegation on uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | छलकपटाने सत्तेत आलेल्या सरकारचा वचपा निसर्गाने काढला, चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना टोला (व्हिडिओ)

Pune Pimpri ACB Trap | 3 लाखाच्या लाच प्रकरणी पिंपरीतील पोलिस उपनिरीक्षकावर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

Benefits of Onion | ‘या’ जबरदस्त उपायाने केसांना मिळेल नवजीवन, होतील दाट आणि लांबसडक