CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांवर टीकास्त्र, म्हणाले – ‘अनेक विकासकामे केली त्यामुळे विरोधकांना…’

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सध्या भंडारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. गेल्या अडीच तीन महिन्यात आमच्या सरकारने अनेक विकासकामे केली त्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

 

राज्यातील विद्यमान सरकार हे काम करणारे सरकार आहे. आमचे सरकार अडीच तीन महिन्यात येवढी कामे करु शकते, तर पुढील दोन तीन वर्षात आम्ही किती कामे करु, या विचाराने विरोधक अस्वस्थ आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आज सकाळपासून मी आतापर्यंत २०० कोटीपेक्षा जास्त रुपयांची भूमीपूजने आणि लोकार्पणे केली आहेत. १०० कोटी रुपये फक्त पाईपलाईन प्रकल्पासाठी खर्च झाले आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर आहे. पण, हा मार्ग पुढे भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली पर्यंत नेण्यात यावा, अशी आमचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि खासदारांची इच्छा आहे. त्यामुळे हा महामार्ग आम्ही भंडाऱ्यापर्यंत नेण्याचा देखील निर्णय घेतला आहे, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde live speech in bhandara not
giving 50 crore we gave 200 crore for development

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा