CM Eknath Shinde | …म्हणून CM एकनाथ शिंदेंनी घेतली रतन टाटांची भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी टाटा समूहाचे (Tata Group) सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा (Senior Businessman Ratan Tata) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची (CM Eknath Shinde) जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या भेटीगाठी घेत आहेत. शिंदे यांनी निवासस्थानी भेट घेतल्यानंतर रतन टाटा यांनी मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल शिंदे यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्यामध्ये काही वेळ दिलखुलास गप्पाही रंगल्या.

राज्यात सुरु असलेली विकासाची कामे रद्द होणार नाहीत. लोकहिताच्या कामांना स्थगिती नाहीच. मागील सरकारच्या शेवटच्या दिवसांत घाईघाईने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना स्थगिती दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. दरम्यान रतन टाटांची ही सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी रतन टाटांनी मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्याबाबत सर्वच क्षेत्रातील दिग्गज आदर बाळगतात.
राजकीय नेतेही याला अपवाद नाहीत. याआधीही विविध पक्षाच्या नेत्यांनी रतन टाटा यांची भेट घेतली आहे.

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde meets ratan tata all the best for your career as chief minister

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray Interview | शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली ? उद्धव ठाकरेचं भाजपकडे बोट

 

SBI Best Investment Scheme | एसबीआयच्या टॉप 5 स्कीम ! येथे 1 लाखाचे झाले 9.5 लाख, 10 वर्षात 857% पर्यंत मिळाला रिटर्न

 

Shivsena Chief Uddhav Thackeray | पुण्यवान होण्यासाठी भाजपमध्ये जा, मुलाखतीतच उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांना सल्ला?