CM Eknath Shinde | ‘अजित पवार मनातून बोलत नाहीत, त्यांना…’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आधी देवेंद्र फडणवीस यांनी 1978 च्या पुलोदच्या प्रयोगावरुन शरद पवारांना लक्ष्य केलं. त्यानंतर पहाटेच्या शपथविधीआधी शरद पवारांबरोबर बैठक झाली होती, असं फडणवीस म्हणाले. त्यावर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्य सरकारनं वर्षभरात चांगली कामगिरी करणं अपेक्षित होतं, अशी टीका केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.

भाजप-शिवसेना युती (BJP-Shiv Sena Alliance) सरकारची आज वर्षपूर्ती होत असून यानिमित्ताने ठाण्याच्या आनंद मठात (Anand Math) शिंदे गटाच्या (Shinde group) कर्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी स्वत: एकनाथ शिंदे तिथे उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून शिंदे गटाच्या कर्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) अजित पवारांच्या टीकेला खोचक प्रत्युत्तर दिलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांचं नाव घेऊन अजित पवारांवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेत्याचं काम काय असतं? सरकारला चांगलं म्हणण्याचं काम असतं का? विरोधी पक्षनेत्यांचे काम त्यांना करू द्या. सरकार म्हणून आम्हाला आमचं काम करु द्या. विरोधी पक्षनेते मनातून बोलत नाहीयेत. त्यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावं लागतंय म्हणून ते बोलतायत. कारण सत्तास्थापनेवेळी शरद पवारांनी काय केलं याची आठवण त्यांना आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना क्लीन बोल्ड वगैरे केल्याचं शरद पवार म्हणाले. पण त्यांनी क्लीन बोल्ड अजित पवारांनाच केलंय. हे अजित पवारांना माहितये. अजित पवार ते विसरणार नाहीत. तेव्हा एकाच वेळी अनेकांशी बोलणी सुरु होती, हेच शरद पवारांनी मान्य केलंय, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Web Title :   CM Eknath Shinde | cm eknath shinde mocks ajit pawar on sharad pawar statement on devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा