CM Eknath Shinde | दिल्लीत पोहोचताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला खासदारांचा आकडा; म्हणाले – ’12 नाही आपले तर 18′

0
328
CM Eknath Shinde | cm eknath shinde not 12 ours are 18 mps eknath shinde told the number as soon as he reached delhi
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे शिवसेनेला (Shivsena) आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेचे राज्यातील 18 पैकी 12 खासदार शिंदे गटात (Eknath Shinde Group) जाऊ शकतात. यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज बंडखोर खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेऊ शकतात. एकनाथ शिंदे दिल्लीत पोहचल्यानंतर 12 नव्हे तर सर्व 18 खासदार आपले असल्याचा दावा केला आहे. (CM Eknath Shinde)

 

सोमवारी रात्री एकनाथ शिंदे दिल्लीत पोहचले असून, आज मंगळवारी ते शिवसेनेच्या बंडखोर खासदारांची बैठक घेऊन शिवसेना आमचीच असल्याचा दावा करतील व एनडीएमध्ये त्यांना अधिकृतपणे सामावून घेतले जाईल, अशी शक्यता आहे. थोडक्यात राज्यात जे घडले होते त्याचा दिल्ली पार्ट 2 सुरू झाला आहे.

 

ठाकरे गटाचे विनायक राऊत (MP Vinayak Raut) हे पक्षाचे लोकसभेतील नेते असून राजन विचारे हे प्रतोद आहेत. त्यांच्या जागी राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांची गटनेतेपदी, तर भावना गवळी यांची प्रतोदपदी नियुक्ती होऊ शकते. (CM Eknath Shinde)

 

शिवसेनेच्या बंडखोर खासदारांनी वेगळा गट तयार केल्यास शिवसेनेला पुन्हा एकदा न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना आपले 18 खासदार असल्याचा दावा केला आहे. पत्रकारांना एकनाथ शिंदे म्हणाले, माझी कुठल्याही खासदारासोबत भेट झाली नाही. पण, 12 कशाला आपले 18 खासदार आहेत, सगळे खासदार मला भेटतील.

शिंदे म्हणाले, मी ओबीसी आरक्षणाच्या (OBC Political Reservation In Maharashtra) केसबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत आलो आहे.
या संदर्भात वकिलांशी चर्चा केली असून 20 तारखेला सुनावणी असल्याचे ते म्हणाले.

 

शिंदे गटात जाण्याची शक्यता असलेले खासदार
राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे, राजेंद्र गावित, प्रतापराव जाधव, भावना गवळी, कृपाल तुमाने, संजय मंडलिक,
धैर्यशील माने, श्रीरंग बारणे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, सदाशिव लोखंडे.

 

शिवसेनेसोबतचे खासदार
अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय (बंडू) जाधव.

दरम्यान, खासदार विनायक राऊत यांनी खासदारांच्या बंडखोरीबाबत म्हटले म्हटले
की, खा. संजय राऊत यांच्या सोमवारच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेला 5 लोकसभा सदस्य उपस्थित होते.
गजानन कीर्तीकर आजारी असून दादरा-नगर-हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे.

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde not 12 ours are 18 mps eknath shinde told the number as soon as he reached delhi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना केव्हा मिळेल 18 महिन्याचा DA एरियर? ही आहे मोठी अपडेट

 

Ramdas Kadam | रामदास कदमांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘उद्धव ठाकरे आजारी, अजितदादांनी डाव साधला’

 

Shivajirao Adhalarao Patil | ‘या’ कारणामुळं तिसऱ्या दिवशी माझी शिवसेनेतून हकालपट्टी केली’ – आढळराव पाटील (व्हिडीओ)