CM Eknath Shinde | मलईदार खाती भाजपकडे, खातेवाटपावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाल्यानंतर रविवारी खाते वाटप जाहिर करण्यात आले. खातेवाटपाच्या घोषणेनंतर भाजपकडे (BJP) महत्त्वाची खाती असल्याच्या मुद्यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु झाली. अर्थ (Finance), गृह (Home), महसूल (Revenue), ग्रामविकास (Rural Development), जलसंपदा (Water Resources), सहकार, ऊर्जा (Energy), गृहनिर्माण (Housing) ही महत्त्वाची खाती भाजपने स्वत: कडे ठेवून सरकारमध्ये आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. यावरुन विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाण्यातील तलावपाली भागात असलेल्या शिवसेना जिल्हा शाखेत (Shiv Sena) ध्वजारोहण केल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पत्रकारांशी बोलत होते.

 

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Swatantryacha Amrut Mahotsav) साजरा करत असताना धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांनी ठाणे शहरामध्ये सुरु केलेल्या परंपरेप्रमाणे ध्वजारोहण करण्यात आले. ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेच्या प्रांगणात रात्री 12.01 मिनीटांनी ध्वजारोहण (Flag Hoisting) सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde), ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के (Thane Former Mayor Naresh Mhaske) यांच्यासह शिंदे गटातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल भाष्य केलं.

 

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, खातं कोणतं आहे यापेक्षा त्या खात्याला आपण न्याय कसा देतो हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्या विभागाची जबाबदारी मंत्र्यांवर दिलेली आहे ती नक्कीच ते यशस्वीपणे पार पाडतील. ते महाराष्ट्रातील जनतेला न्याय देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

शिदे गट आणि भाजपकडे कोणती खाती ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खाते (Urban Development) कायम ठेवले आहे.
तर गृह आणि अर्थ ही सर्वात महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत: कडे ठेवली आहेत.
आधीच्या ठाकरे सरकारमध्ये (Thackeray Government) शिवसेनेकडे असलेल्या मंत्र्यांची खाती शिंदे गटाकडे (Shinde Group) कायम ठेवण्यात आली आहेत.
तर राष्ट्रवादीकडे (NCP) असलेली सर्व प्रभावी आणि मलईदार खाती भाजपच्या वाट्याला गेली आहे.

 

शिंदे गटाकडे नगरविकास, परिवहन, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, कृषी, सार्वजनिक बांधकाम (रस्ते विकास मंडळ),
पणन, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, अल्पसंख्याक, उद्योग, पाणीपुरवठा, बंदरे, खणकाम, अन्न व औषधे प्रशासन, शालेय शिक्षण ही खाती आली आहेत.
भाजपकडे गृह, अर्थ, महसूल, ऊर्जा, गृहनिर्माण, जलसंपदा, ग्रामविकास, आदिवासी विकास,
वैद्यकीय शिक्षण ही सर्व महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार आहेत.

 

Web Title : –  CM Eknath Shinde | cm eknath shinde on bjp gets plum portfolios in maharashtra cabinet shinde faction inherits senas past positions

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा