CM Eknath Shinde | ‘हा प्रकल्प होऊ नये म्हणून बैठका झाल्या’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उदघाटन झाल्यानंतर पुढील एक वर्षात दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सहकार्याची माहिती दिली. शिवाय त्याचवेळी प्रकल्प होऊ नये म्हणून प्रकल्पाला विरोध झाल्याची माहिती ही शिंदेंनी दिली.

 

एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अनेक बैठका झाल्याची माहिती यावेळी बोलताना दिली. शिंदे म्हणाले, “आज मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या महामार्गाचं लोकार्पण आमच्याच कारकिर्दीत होत आहे. यासाठी खूप अडचणी आल्या. जमीन अधिग्रहणाला खूप विरोध झाला. लोकांना विरोध करायला लावला गेला. हा प्रकल्प होऊ नये, जमिनी दिल्या जाऊ नयेत म्हणून बैठका झाल्या.” एकनाथ शिंदेंनी एकाप्रकारे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्ला चढविला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या भाषणातही आधीच्या सरकारने या प्रकल्पासाठी जमिनी मिळू नये म्हणून प्रयत्न केल्याचे म्हणाले.

तसेच पंतप्रधान मोदींचे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आनंद झाला, असे पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आज मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन झालं. आणखी काही कार्यक्रम होत आहेत.
समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा हा क्षण माझ्यासाठी फक्त स्वप्नपूर्तीचा नाही, तर अभिमानाचा, गर्वाचा आहे.
अभिमान यासाठी की या कार्यक्रमाला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले.
आनंद याचा आहे की देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी त्यांच्या संकल्पनेतून काम केलं.
आता मी मुख्यमंत्री असताना आणि आम्ही दोघं एकत्र असताना पंतप्रधानांच्या हस्ते याचं लोकार्पण होतंय.
या महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव आम्ही दिलंय याचाही मोठा आनंद आहे.”

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde on samruddhi mahamarg inauguration targets uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा