CM Eknath Shinde | ‘भाजपकडून सापत्न वागणूक’ कीर्तिकरांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले- ‘कोणाला काहीही…’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) घटक पक्ष आहोत. तरीही, भाजपकडून (BJP)आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे. असं विधान शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर (Shinde Group MP Gajanan Kirtikar) यांनी केले आहे. कीर्तिकर यांनी केलेल्या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अहमदनगर येथे एका कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना (Shivsena)आणि भाजप मित्र आहेत. त्यात निवडणुकीला आणखी वेळ आहे. त्यामुळे सर्व व्यवस्थित होईल. कोणाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. यावेळी त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या विधानाबाबत शिंदे यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी मोजक्या शब्दात उत्तर दिले. चिखलात दगड मारल्यावर काय होत? असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

काय म्हणाले गजानन कीर्तीकर?

गजानन कीर्तीकर म्हणाले, आम्ही 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो. आमचा शिवसेना (Shivsena) पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) घटक आहे. त्यामुळे एनडीएचा घटक पक्ष असल्याप्रमाणेच आमची कामं झाली पाहिजेत. (Maharashtra Politics News) मी हा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडला. भाजपकडून आम्हाला घटक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे. त्याप्रमाणे आम्हाला वागवले गेले पाहिजे. मात्र, भाजपकडून आमच्या खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप कीर्तीकर यांनी केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले, तुम्ही जो काय शिंदे-मिंधे गट म्हणत आहात त्यांच्याकडे मी पक्ष म्हणून पाहतच नाही.
भाजपने पाळलेल्या कोंबड्यांचा तो खुराडा आहे. गावाला कोंबड्यांचे खुराडे असतात,
कधीही कुठल्याही कोंबड्या कापल्या जातील. हे लक्षात घ्या. तो पक्ष नाहीच, कोंबड्या कॉक कॉक आरवत असतात.
तसं ते बोलतात, पक्ष म्हणून त्यांच्याकडे काय बैठक आहे? काय विचारधारा आहे?
निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्ष आणि चिन्ह विकत दिलं म्हणजे तो पक्ष ठरत नाही.

 

Web Title :  CM Eknath Shinde | cm eknath shinde on shinde group mp gajanan kirtikar statement on bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा