CM Eknath Shinde | संजय राऊतांना एकनाथ शिंदेंचा टोला, म्हणाले – ‘त्यांना स्वप्नातच…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे (Shivsena) प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर होईल असा दावा केला आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांना स्वप्नातच राहू द्या, असा टोला शिंदे यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके (Liladhar Dake) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

 

काय म्हणाले राऊत ?

महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर होईल असं भाकित शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) संविधानाच्या (Constitution) आणि कायद्याच्या (Law) विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची खात्री असल्याने 16 आमदार (MLA) अपात्र ठरतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. तसेच स्वत:चा बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या शेड्युल्ड नुसार अपात्र ठरतील हे नक्की आहे. त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. मग ते स्वत: ला शिवसैनिक कसं म्हणवणार असा टोला राऊतांनी लगावला. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरुन टीका केली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray) आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल द्वेष, तिरस्कार शिंदे गटातील आमदारांमध्ये दिसतोय. परंतु हा द्वेष, तिरस्कार महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या मनात नाही. भावनेच्या भरात काहींना फसवून शिंदे गटात सामील केलेय. त्यातील काही आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भविष्यात पुन्हा महाराष्ट्रात सत्ताबदल होईल असा दावा संजय राऊतांनी केला.

 

त्यांना स्वप्नातच राहू द्या…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारले असता त्यांनी टोला लगावत म्हणाले, ते स्वप्न पाहत असतात, त्यांना स्वप्नातच राहू द्या.
राज्यात 166 लोकांचं सरकार आहे. लोकसभेत देखील 12 खासदारांनी अध्यक्षांना पत्र दिलं आहे.
दोन्ही सभागृहात आमच्याकडे बहुमत असून सरकार मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या.

ते पुढे म्हणाले, ओबीसी समाजाचे आरक्षण (OBC Reservation) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) प्रलंबित होतं.
त्यामुळे मी तीन-चार वेळा दिल्लीला गेलो होतो. मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञ, वकील, वरिष्ठ विधज्ञ यांच्या बैठका घेतल्या.
त्यातून या राज्यातील ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम सरकारने केले आहे. याबाद्दल मी सुप्रीम कोर्टाचा आभारी आहे.
यावेळी त्यांनी राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होईल असे सांगितले.

 

Web Title : –  CM Eknath Shinde | cm eknath shinde on shivsena sanjay raut maharashtra government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा