CM Eknath Shinde | ‘इंडिक टेल्स’ संकेतस्थळावर सावित्रीबाई फुलेंबाबत आक्षेपार्ह लिखाण, मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे निर्देश; म्हणाले- ‘महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या बाबत आक्षेपार्ह लिखाण इंडिक टेल्स या वेबसाईटवर (India Tales Website) प्रसिद्ध झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), समता परिषद (Samata Parishad), सामाजिक संघटनांनी (Social Organizations) या वेबवसाईटवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा निषेध करत राज्य सरकारने (State Government) भूमिका घेण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गंभीर दखल घेतली आहे. आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या इंडिक टेल्स या वेबसाईटविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. तसेच महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

इंडिक टेल्स या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. त्याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले आहेत. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना (Chief Secretary) दिले आहेत.

 

महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला पाहिजे. तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही, याची दक्षता लेखक किंवा प्रशासन संस्थांनी घेणं गरजेचं आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशारा देताना इंडिक टेल्स वरील लेखात आक्षेपार्ह बाबी असतील तर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका शिष्टमंडळाने आज मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai CP)
विवेक फणसाळकर (IPS Vivek Phansalkar) यांची भेट घेऊन निवेदन दिले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणाऱ्या इंडिक टेल्स आणि
हिंदू पोस्ट या वेबसाईट्सवर (Hindu Post Website) कारवाई व्हायला हवी. अशी मागणी आज शिष्टमंडळानं केली आहे.
यावेळी अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

 

 

Web Title :  CM Eknath Shinde | cm eknath shinde order action indic tales website for offensive writing about savitribai phule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा