CM Eknath Shinde | CM शिंदेंकडून भुजबळांच्या मागणीचे समर्थन, म्हणाले – ”तीच भूमिका सरकारचीही आहे…”

मुंबई : CM Eknath Shinde | मराठ्यांना (Maratha Reservation) ओबीसीतूनच आरक्षण (OBC Reservation) द्या, अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) करत आहेत. तर या मागणीला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उघडपणे विरोध केला आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, शिंदे समिती रद्द करावी, अशी मागणी भुजबळांनी केली आहे. भुजबळांमुळे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची कोंडी होत असल्याची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मात्र भुजबळांच्या मागणीचे स्पष्ट शब्दात समर्थन केले आहे.

आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धी
माध्यमांना प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, कुणब्यांच्या जुन्या नोंदींबाबतचा जीआर आम्ही काढलेला नाही. १९६७ ते २००४ पासून याच जीआरचा अवलंब केला जात आहे. ज्या ठिकाणी कुणबी नोंदी असताना दाखले मिळत नव्हते, तिथे दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, छगन भुजबळांची एवढीच मागणी आहे की, ओबीसीचे आरक्षण कमी होता कामा नये.
तीच भूमिका सरकारचीही आहे. आम्ही ती स्पष्टपणे घेतली आहे. आमची भूमिका कायम आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जहरी टीका, ”असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक”

Ajit Pawar Group | अजित पवार गटाचे विधीमंडळाच्या नोटिसीला 260 पानी उत्तर, राष्ट्रवादी पक्ष आमचाच असल्याचा केला दावा

Pune Pimpri Crime News | पिंपरी : गहुंजेत कोयता गँगची दहशत, घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या; दोघांना अटक