CM Eknath Shinde | बंडखोरी करण्याची वेळ शिंदे गटावर का आली? खुद्द एकनाथ शिंदे यांनीच केला खुलासा, म्हणाले – ‘आम्ही केलेला हा मोठा कार्यक्रम…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | 2014 ला भाजपाने (BJP) शिवसेनेला (Shivsena) उपमुख्यमंत्रीपद (Deputy Chief Minister) देऊ केले होते. भिवंडीत झालेल्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वत: मला म्हणाले होते की, तुमच्याकडे नवीन जबाबदारी येणार आहे. पण मला माहिती होते की शिवसेना हे पद स्वीकरणार नाही. तेव्हा उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले असते, तर ते मला द्यावे लागले असते. त्यामुळेच ते पद तेव्हा शिवसेनेने नाकारले, असा पुनरूच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला आहे. ते एका मराठी वृत्तपत्राला मुलाखत देताना बोलत होते.

 

2019 च्या निवडणुकांमध्येही मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे येऊ शकले असते, या चर्चेवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, जर तरला काही अर्थ नाही. पण महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन करण्यास माझाही विरोध होता. तो मी नेतृत्वाच्या कानावर घातला होता.

 

बंडखोरी करण्याची वेळ शिंदे गटावर (Shinde Group) का आली? यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला की, असा निर्णय घेताना फार विचार लागतो.
हे काही छोटे काम नाही. आम्ही केलेला हा मोठा कार्यक्रम आहे.
ही वेळ का आली? एवढ्या मोठ्या प्रमाणावर असंतोष का निर्माण झाला? याचे कारण एका दिवसात तयार झालेले नाही.
जेव्हा राजकारणात एखाद्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, एखादा पक्ष किंवा पक्षाचा नेता जेव्हा याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा अशा मोठ्या घटना घडतात.

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde reveals shivsena offered deputy cm post by bjp devendra fadnavis in 2014

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Deepak Kesarkar | शिंदे गटात सामील झालेल्या दीपक केसरकरांना लागली लॉटरी, मुंबईच्या पालकमंत्री पदाची मिळाली जबाबदारी

Raj Thackeray | मनसेचा मोठा गौप्यस्फोट ! राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ‘दसरा मेळाव्यावरून दिला होता ‘हा’ सल्ला, मात्र…’

Nashik Crime | पतीचा निर्घुण खून करुन पत्नी गेली पळून; दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा