CM Eknath Shinde | ‘तुम्ही बाळासाहेबांच्या शब्दला तिलांजली दिली’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे गटातील (Thackeray Group) नेत्यांनी बंडखोर गटावर सातत्याने टीका करत आहेत. शिंदे गटाकडून त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  आज (रविवार) अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोड मतदारसंघात आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. तसेच मागील काळात घडलेल्या सर्व घटनांवर भाष्य केले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, ही लढाई सोपी नव्हती. लोकं सत्तेत येण्याचा प्रयत्न करतात तर आम्ही सत्तेतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांना पन्नास-शंभर कोटी निधी मिळायचा आणि आपल्या नेत्यांना पाच-दहा कोटी मिळायचे. त्यांना सुरक्षा मिळाली तर आपले खच्चीकरण व्हायचे.

 

योगेश कदमांचे खच्चीकरण केले

या ठिकाणी रामदास कदम (Ramdas Kadam) आहेत, त्यांचे किती खच्चीकरण केले, हे साऱ्या जनतेने पाहिले आहे. त्यांचे मतभेद असतील, पण त्यांच्या मुलाने काय केले? आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांचे किती खच्चीकरण केलं. त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. ज्या माणसांनी बाळासाहेबांसोबत काम केले, त्या माणसाची तुम्ही काय अवस्था केली? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी यावेळी विचारला.

 

बाळासाहेबांच्या शब्दाला तिलांजली दिली

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक (Shiv Sainik) आहोत. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस (Congress)-रष्ट्रवादीला कधी जवळ केलं नाही, त्यांच्या शब्दाला तुम्ही तिलांजली दिली. आम्ही हिंदुत्वाचे विचार पुढे नेत आहोत. जी लोक सावरकरांवर बोलयची, त्यांच्याविरोधात एकही शब्द आम्हाला काढता येत नव्हता. ज्यांचे दाऊद सोबत कनेक्शन आहे, त्यांच्याविरोधात आम्ही बोलू शकत नव्हतो.
मग बाळासाहेबांचे, आनंद दिघे (Anand Dighe) यांचे विचार कसे पुढे नेणार.
बाळासाहेबांनी आम्हाला अन्यायाविरोधात लढायला शिकवलं आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

आघाडीला आमचा विरोध होता

शिंदे म्हणाले, मी साक्षीदार आहे, शिवसेना भाजप युती (Shivsena-BJP Alliance) म्हणून आपण निवडून आलो होतो.
मी तेव्हा उद्धव ठाकरे यांना म्हणालो होतो की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आपण समोर बसून चर्चा करु.
प्रत्येक समस्येतून मार्ग काढता येतो, फक्त शोधण्याची इच्छाशक्ती असावी लागते.
पण, तसं झालं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु झाली
त्यावेळी आम्ही सगळे म्हणालो की अशी आघाडी करु नका.
पण पक्षाचा आदेश ऐकायचा ही बाळासाहेबांची शिकवण आहे.
नंतर आघाडी झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- CM Eknath Shinde | CM eknath shinde shivsena balasaheb thackeray uddhav thackeray congress ncp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा