CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवर निशाणा, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | पक्षात बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे अतिशय मोजक्याच शब्दात बोलत होते. सुरूवातीपासून आजपर्यंत ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांचे सतत नाव घेत आहेत. मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना शिवसेनेवर (Shivsena) टिका केली. शिवसेनेला डिवचताना शिंदे म्हणाले, राज्यात हिंदुत्वाचे सरकार आले असून बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे सरकार स्थापन झाले आहे. (CM Eknath Shinde)

 

आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतही काम केले आहे. अनेक नेत्यांचे खटलेदेखील लढवले आहेत. अध्यक्ष सत्ताधार्‍यांना झुकते माप देतील अशी अपेक्षा नाही. (CM Eknath Shinde)

 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हे हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे सरकार स्थापन झाले आहे. आतापर्यंत अनेकजण विरोधातून सत्तेत जातात. मात्र, आम्ही सत्तेतून विरोधात गेलो. या घटनेची राज्यातच नव्हे तर देशातही याची नोंद होईल.

शिंदे म्हणाले, माझ्यासोबत 8 ते 9 मंत्रीदेखील सत्तेतून बाहेर पडले.
एका बाजूला सत्ता, मोठी माणसे आणि दुसर्‍या बाजूला बाळासाहेब, आनंद दिघे यांच्या विचारांचा सामान्य कार्यकर्ता होता.
माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर 50 आमदारांनी विश्वास ठेवला हे माझे भाग्य समजतो.

 

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, काहींनी मोठे दावे केले. आमच्या संपर्कात 10 आमदार आहेत, 20 आमदार आहेत.
मी त्यांना नावे सांगण्याचे आवाहन केले होते. त्यांची नावे समजली असती तर त्यांना विमानाने पुन्हा पाठवले असते.
एका आमदाराला माघारी पाठवले, असे म्हणत शिंदे यांनी शिवसेनेला डिवचले.

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde speaking on rebels within party and take on shivsena leader maharashtra politics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sudhir Mungantiwar To Ajit Pawar | सुधीर मुनगंटीवारांचा अजित पवारांना खोचक टोला; म्हणाले – ‘…तर तुम्हीही आमच्या कानात’

 

Samantha Ruth Prabhu | समंथाने सांगितले लग्न तुटण्याचे कारण, म्हणाली….

 

Maharashtra Vidhansabha Speaker Election | शिवसेना मोठ्या खेळीच्या तयारीत? बंडखोरांवर विधानभवनाच्या गॅलरीतून ‘वॉच’?