CM Eknath Shinde | ‘मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात पण…’, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मागितली टाळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत (Shivsena) बंड करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पक्षाला आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray) यांना जोरदार हादरा दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. शिंदे गटाने (Shinde Group) भाजपच्या (BJP) मदतीने राज्यात नवीन सरकार स्थापन केले. नव्या सरकारला स्थापन होऊन अडीच महिने झाले. याच दरम्यान ठाकरे-शिंदे हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दोन्हीकडून अद्याप मनोमिलनाचा प्रयत्न झाला नसला तरी आज विश्व मैत्री दिवसाच्या (World Friendship Day) निमित्ताने भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांना टाळी देण्यासाठी हात पुढे केला आहे. मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात, असं म्हणत त्यांनी मनोमिलनाची तयारी दाखवली आहे.

 

भारत जैन महामंडळ (Bharat Jain Corporation) यांच्या वतीने आयोजित विश्व मैत्री दिवसाच्या क्षमापना समारोहाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उपस्थित राहून जैन साधू आणि साध्वींना अभिवादन करुन त्यांचे आर्शिर्वाद घेतले. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari), मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangalprabhat Lodha) उपस्थित होते.

 

या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी मैत्री दिवसाच्या (Friendship Day) निमित्ताने उद्धव ठाकरेंना झालं गेलं विसरुन जा, असं अप्रत्यक्षपणे सांगत एकत्र येण्याची साद घातली.
मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात पण क्षमा करण्यासाठी मोठं काळीज लागतं,
असं म्हणत एकनाथ शिंदेंनी मैत्रीचा चेंडू ठाकरेंच्या कोर्टात ढकलला.
उद्धव ठाकरे यांनी ‘पुनश्च हरिओम’ म्हणत मागील अडीच महिन्यांमधल्या घटना विसरुन ‘आवाज’ द्या, अशी अपेक्षाच शिंदे यांनी अप्रत्यक्ष बोलून दाखवली.

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm-eknath-shinde-taunts-shivsena chief uddhav-thackeray on World Friendship Day

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

आता घरबसल्या पेन्शनर्स जमा करू शकतात Digital Life Certificate, EPFO ने लाँच केले अ‍ॅप, जाणून घ्या प्रक्रिया

30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा Demat Account संबंधित हे महत्वाचे काम, अन्यथा करू शकणार नाही शेअरची खरेदी-विक्री

MP Vinayak Raut | एकनाथ शिंदेवर टीका करताना विनायक राऊत यांची जीभ घसरली, म्हणाले…