CM Eknath Shinde | नोटीस बजावूनही राजन विचारे अन् केदार दिघे सोहळ्याला उपस्थित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Swatantryacha Amrut Mahotsav) साजरा करत असताना धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांनी ठाणे शहरामध्ये सुरु केलेल्या परंपरेप्रमाणे ध्वजारोहण करण्यात आले. ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेच्या प्रांगणात मध्यरात्री ध्वजारोहण (Flag Hoisting) सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ), खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde), ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के (Thane Former Mayor Naresh Mhaske) यांच्यासह शिंदे गटातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 

ठाण्यातील या कार्यक्रमापूर्वी ठाकरे गटाचे (Thackeray Group) ठाण्याचे खासदार राजन विचारे (Thane MP Rajan Vikhare) आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे (District Chief Kedar Dighe) यांना नोटीस बजावली होती. परंतु यानंतरही राजन विचारे आणि केदार दिघे उपस्थित होते. त्यामुळे याठिकाणी काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. परंतु सुदैवाने कायदा व सुव्यवस्थेची (Law and Order) परिस्थिती निर्माण झाली नाही.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अमृत महोत्सव देशभरात सजारा होत आहे. देशभक्तीची लाट नागरिकांमध्ये उत्पन्न झाली आहे.
सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो, असं शिंदे म्हणाले. तसेच आनंद दिघे यांनी ही ठाण्यात परंपरा सुरु केली त्याचा आनंद होत आहे.
राज्यातही घरोघरी तिरंगा (Har Ghar Tiranga ) कार्यक्रम आयोजित केला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

राजन विचारे आणि केदार दिघे यांच्या उपस्थितीबाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले,
ज्यांना या ध्वजारोहण समारंभासाठी उपस्थित राहायचं आहे, त्यांना येऊ द्या.
राजन विचारे यांच्या समवेत कोणावरही कारवाई करु नका, असं पोलिसांना सांगितले आहे.
तसेच खात कोणतं आहे, या पेक्षा आपण न्याय कसा देतो, हे महत्त्वाचं. त्यामळे ज्या विभागाची जबाबदारी मंत्र्यांवर दिली आहे, ते नक्कीच राज्यातील जनतेला न्याय देतील, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

 

Web Title : –  CM Eknath Shinde | cm eknath shinde told the police that no action should be taken against anyone including mp rajan vikhare and kedar dighe thane news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा