मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार (Shivsena MLA) जाणार आहेत. अयोध्येला जाऊन (Visit Ayodhya) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रभू रामचंद्रांचं (Prabhu Ramachandra) दर्शन घेणार आहेत तसेच शरयू नदीच्या काठी पूजा आणि आरतीही करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा आमदार आणि खसदारांना (MP) घेऊन अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांच्या दौऱ्याची तारीख निश्चीत झाली आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असणार आहे.
धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) मिळाल्यानंतर आमचं ठरलं होतच की, प्रभू रामाचे दर्शन घ्यायचे. गुढीपाडव्याच्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 6 ते 10 एप्रिल हा आपला अयोध्या दौरा असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) जे जे बोलत आहेत ते पुर्णत्वास येत आहे. बाळासाहेबांचे विचार बरोबर घेऊन चाललं तर धनुष्यबाण कळायला काही हरकत नसल्याचे भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणाले.
शिवसेनेत बंड करण्यापूर्वी काही दिवस आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासोबत एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले होत. एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जातना मुलगा खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर निघालेल्या आमदारांनाही सोबत घेऊन जाणार असल्याची चर्चा आहे. शिंदे यांचा हा अयोध्या दौरा राजकीय रणनितीचा एक भाग असल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करण्याची अनेक कारणं सांगितले. त्यापैकी एक कारण उद्धव ठाकरे
(Uddhav Thackeray) हिंदुत्ववादापासून (Hindutva) दुरावले आहेत, हे एक आहे.
2019 मध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीसारख्या (NCP)
पक्षासोबत युती केली. तसेच भाजपसोबतची (BJP) युती तोडली.
हिंदुत्वाच्या मुद्यावर मागील तीन दशकांपासून शिवसेना आणि भाजप एकत्र होते.
आता एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जात आपला पक्ष हिंदुत्ववादी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न आहे.
Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde visit ayodhya on april 6
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | रूम भाड्याने देताय सावधान; डिपॉझिट पाठविण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक