CM Eknath Shinde | तुम्हाला माहितच आहे, सरकारच्या पाठिशी…, अमित शहांचे नाव घेत एकनाथ शिंदेंचे सूचक वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची शिवतिर्थ (Shivtirtha) निवासस्थानी भेट घेऊन गणपतीचे दर्शन घेतले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांची आज घेतलेली भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्पष्ट केलं. या दोन नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली.

 

माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, गणपतीचं आगमन झालं आहे. अतिशय उत्साहाचं वातावरण आपण पाहतोय. गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav) आम्ही एकदुसऱ्याकडे जात असतो. गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे यांच्या घरी आलो. त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राजकीय चर्चा (Political Discussion) झाली नाही. मात्र राज ठाकरे यांच्याशी बोलताना आनंद दिघे (Anand Dighe) साहेबांच्या आठवणी निघाल्या. राज ठाकरे यांचेही आनंद दिघे यांच्यासोबत चांगले संबंध होते. शेवटी आम्ही सगळ्यांनी बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) मार्गदर्शनाखाली काम केलं.

 

सरकारच्या पाठीशी…

अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत, त्यांची भेट घेणार का असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. यावर शिंदे म्हणाले, अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. शिवसेना-भाजप युती (Shivsena-BJP Alliance) आहे. आपल्याला माहितीच आहे की, सरकारच्या पाठिशी.., असं म्हणत शिंदे यांनी सूचक विधान केलं. तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भक्कम पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले.

 

दसरा मेळावा कोणाचा ?

शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला आहे.
त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा (Dasara Melava 2022) नेमका कोणाचा होणार असा प्रश्न आहे.
यावर आज एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, अजून गणपती सुरु आहे, त्यानंतर दसरा येईल.
त्यावेळी आपण पाहू. हे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे.
अतिशय कमी वेळात आम्ही चांगलं काम केलं आहे. हे काम असंच सुरु राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

 

Web Title : –  CM Eknath Shinde | CM eknath shinde visit to raj thacakerays house amit shah shinde fadnavis government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा