CM Eknath Shinde | विधान परिषद निवडणुकीदरम्यान असं काय घडलं? आमदार सोबत कसे आले? – एकनाथ शिंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य विधीमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन (State Legislative Assembly) काल आणि आज झाले. यामध्ये पहिल्या दिवशी अध्यक्षांची निवड तर आज दुसर्‍या दिवशी विश्वासदर्शक ठराव संमत करण्यात आला. या दोन दिवसात सत्ताधारी आणि विरोधी बाजूकडून अनेक नेत्यांची सभागृहात भाषणे झाली. शिवसेनेमध्ये झालेली बंडखोरी (Shivsena Rebels) आणि तत्पूर्वी आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडींचा या भाषणांमध्ये सातत्याने उल्लेख येत होता. अशाच प्रकारे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर केलेले भाषण तेवढेच महत्वाचे ठरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणात अनेक गोष्टी उघडपणे मांडल्या. विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council Election) काय घडले, बंडाला सुरूवात कशी झाली, याबाबतही त्यांनी गौप्यस्फोट केला.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, राज्यात शिवसेना भाजपा युतीचे (Shivsena – BJP Alliance) सरकार स्थापन झाले आहे. गेले 15-20 दिवस शिवसेना आणि सहयोगी पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून एवढा मोठा निर्णय घेण्याचे धाडस केले, त्यांचे मी आभार मानतो. लोक विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात जातात. पण माझ्यासोबत आलेले मंत्री (Minister) आणि आमदार (MLA) आम्ही विरोधी पक्षाकडे गेलो. यासाठी आमच्या मंत्र्यांनी मंत्रिपद, आमदारकी पणाला लावली.

 

विधान परिषद निवडणुकीच्या काळात सुरू झालेल्या बंडाबाबत मोठा गौप्यस्फोट करताना एकनाथ शिंदे म्हणाले, ज्या दिवशी विधानभवनातून आम्ही निघालो. त्याच्या आदल्या दिवशी मी अस्वस्थ होतो. दुसर्‍या दिवशी मतदान होते. त्या दिवशी मला जी वागणून मिळाली. माझ्याशी ज्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न झाला त्याचे साक्षीदार इकडचे आणि तिकडचे आमदार आहेत.

शिंदे पुढे म्हणाले, नम्रपणे सांगतो की, त्यावेळी मला तेव्हा काय झाले माहिती नाही. बाळासाहेब (Balasaheb Thackeray) नेहमी सांगायचे की अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी बंड असेल उठाव असेल काही असे केले पाहिले. माझा फोन फिरू लागला आणि धडाधड लोक जमू लागले. कुठे जातोय काय करतोय, कशासाठी जातोय कुणी काही विचारले नाही.

 

एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही निघाल्यानंतर जयंत पाटील (Jayant Patil), अजित पवार (Ajit Pawar), मुख्यमंत्री महोदयांचाही फोन आला.
इतरांचेही फोन आले. काही लपवणार नाही. मला विचारले, कुठे चाललात? मी म्हणालो मला माहिती नाही.
कधी येणार? मी म्हटलं मला माहिती नाही. आमच्या आमदारांनाही फोन आले, पण एकाही आमदाराने असे म्हटलं नाही
की, आपण मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊया. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, हा त्यांचा विश्वास आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीची कारणे सांगताना एकुणच प्रवास सांगताना म्हटले की, हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही.
माझे खच्चिकरण कसे होत होते, हे सुनील प्रभू यांनाही माहिती आहे. त्यामुळे शेवटी हा शिवसैनिक आहे.
मी ठरवले की लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माधार नाही.
शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल. एकटा शहीद होईन. एकटा शहीद होईल बाकीचे वाचतील.

 

शिंदे पुढे म्हणाले की, मी आमदारांना सांगितले होते की चिंता करू नका. ज्या दिवशी मला वाटेल तुमचे नुकसान होत आहे,
त्यादिवशी मी तुम्हाला सांगेन आणि तुमचे भवितव्य सुरक्षित करेन आणि जगाचा निरोप घेऊन निघून जाईन.

 

Web Title :- CM Eknath Shinde | CM eknath shinde what happened during the legislative council elections how did the mla come along eknath shindes big blast in the assembly

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gulabrao Patil | ‘आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात’, गुलाबरावांची संजय राऊतांवर घणाघाती टीका

 

Diabetes Diet | डायबिटीज रूग्णांची शुगर लेव्हल ताबडतोब होईल कंट्रोल, ‘या’ 5 गोष्टींचे करा भरपूर सेवन

 

Monsoon Health Tips | मान्सूला झाली सुरुवात, चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, बिघडू शकते तब्येत