CM Eknath Shinde | वेदांता-फॉक्सकॉन वरुन राजकारण तापलं, मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; उद्या दिल्लीत घेणार केंद्रीय मंत्र्यांची भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वेदांता-फॉक्सकॉन हा हजारो कोटींचा प्रकल्प (Vedanta-Foxconn Project) महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांसह विविध क्षेत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) टीकेची झोड उठत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उद्या (बुधवार) दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यात केंद्रीय मंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगितले जात आहे.

वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प गमावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. राज्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिंदे हे दिल्ली दौरा (Delhi Tour) करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) आणि अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांची भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी 30 मिनिटे चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या फोनवरील चर्चेत प्रामुख्याने वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात राज्यात गेल्यामुळे तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती समोर आली. आता या वादानंतर शिंदे हे दिल्लीला चालले आहेत.

दोन वर्षात रिस्पॉन्स मिळाला नाही

मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल (Vedanta owner Anil Aggarwal),
फॉक्सकॉन आणि केपीएमजी (KMG) यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) हे देखील उपस्थित होते.
यावेळी सरकारकडून ज्या सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील.
तळेगाव जवळील 1100 एकर जमीनही आम्ही देऊ केली होती.
30 ते 35 हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या,
अशी माहिती एकनाथ शिंदे दिली. या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता,
तो कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या,
असं शिंदे यांनी म्हटलं.

Web Title :-  CM Eknath Shinde | cm eknath shinde will visit delhi tomorrow and will meet bjp leader union minister nitin gadkari

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Municipal Corporation | सात दिवसानंतरही पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद रिक्त; स्मिता झगडे यांची नियुक्ती कोणी रोखली?

Maharashtra Police | गणेश विसर्जन मिरवणुकीत खाकी वर्दीतील पोलीस नाचल्यावरुन वादंग, DGP कार्यालयाने दिले ‘हे’ निर्देश

Rupee Co Op Bank | रुपी बँकेच्या दोषी संचालक, अधिकार्‍यांवर कारवाईसाठी उच्च न्यायालयात याचिका

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, भाजप नेत्याच्या अध्यक्षतेखाली नेमली मंत्रिमंडळ उपसमिती