CM Eknath Shinde | आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात नवरात्रोत्सवाच्या स्वागत कमानींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर

मुंबई : नवरात्रोत्सवानिमित्त (Navratrotsav) वरळी मतदारसंघात (Worli Constituency) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे बॅनर (Banner) लागले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Elections) पार्श्वभूमीवर भाजपची (BJP) वरळी मतदारसंघावर नजर असतानाच आता शिंदे गट (Shinde Group) सुद्धा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या मतदारसंघात विशेष रस दाखवत असल्याचे दिसत आहे. (CM Eknath Shinde)

मुंबईतील वरळीतील अनेक नवरात्र मंडळांसमोर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. येथील काही स्वागत कमानींवर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे फोटो आहेत. वरळीत शिवसेनेच्या (Shivsena) बॅनरपेक्षा शिंदे यांचेच बॅनर जास्त दिसत आहेत. या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena Chief Balasaheb Thackeray) यांचाही फोटो आहे.

गणेशोत्सवातही एकनाथ शिंदे यांचे वरळी मतदारसंघात बॅनर लावण्यात आले होते. वरळीचा मार्केटचा राजा येथे श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्वागत कमानीवर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, असे पोस्टर लावण्यात आले होते. कमानीवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे (Anand Dighe) यांचेही फोटो होते. त्यामुळे वरळीतील शिवसेना पदाधिकार्‍यांमध्ये फूट पाडण्याचा शिंदे गटाचा हेतू स्पष्ट झाला होता.

शिवसेनेचा गड असलेल्या वरळी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व माजी मंत्री आदित्य ठाकरे हे करतात.
यापूर्वी सचिन अहिर (Sachin Ahir) हे वरळी मतदारसंघाचे आमदार होते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी (NCP)काँग्रेसमध्ये असलेले सचिन अहिर शिवसेनेत आले
आणि त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडला.
त्यानंतर आदित्य ठाकरे इथून निवडून आले आणि राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री झाले होते.

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shindes banners in aaditya thackerays worli constituency on occasion of navratri 2022

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sambhaji Raje Bhosale | रायगडावर पिंडदान विधी : संभाजीराजे भोसले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले – अशा विधीला परवानगी…

Pune Crime | लॉन्ड्री चालकाचा खून करुन मृतदेह फेकला डेक्कन परिसरातील नदीपात्रात, प्रचंड खळबळ

Fiber Rich Foods | जपानी लोकांसारखे दिर्घायुष्य हवे असेल तर खाण्यास सुरुवात करा ‘हे’ 6 सुपरफूड