CM Eknath Shinde – Devendra Fadnavis | ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता यांच्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे’, गाण्याचा समजून घ्या अर्थ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde – Devendra Fadnavis | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांची एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. यामध्ये त्या पती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसत आहे. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने फडणवीस आणि शिंदे यांच्या भेटीच्या निमित्ताने अमृता यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शोले चित्रपटातील गाण्याची ओळ लिहिली आहे. ट्विटमध्ये अमृता यांनी लिहिले आहे की, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. सोबतच लिहिले आहे महाराष्ट्रातील दोन अनमोल रत्नांसोबत. (CM Eknath Shinde – Devendra Fadnavis)

 

अमृता यांचे हे ट्विट पोस्ट झाल्यानंतर चांगलेच व्हायरल होत आहे. राजकीय वर्तुळात फ्रेंडशिप डेची पोस्ट म्हणून याकडे पाहिले जात असले तरी त्याचा राजकीय अर्थ जास्त गडद आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून एकप्रकारे ते दावे खोडून काढले आहेत, ज्यात फडणवीस आणि शिंदे यांची मैत्री फार काळ टिकणार नसल्याचे बोलले जात आहे. ही मैत्री तुटणार नसल्याचे अमृता यांनी पोस्टमधून स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर शिंदे-फडणवीस यांची मैत्री फार काळ टिकणार नाही, असे दावे विरोधकांकडून केले जात आहेत. (CM Eknath Shinde – Devendra Fadnavis)

 

शिंदे दिल्ली दौर्‍यावर, या प्रश्नाने झाले अस्वस्थ

नीती आयोगाच्या 7 व्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गेलेले एकनाथ शिंदे पत्रकारांच्या प्रश्नांवर खुप अस्वस्थ दिसले. वास्तविक त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता तो शिवसेनेच्या दोन गटांतील समेटाचा. शिंदे गटाच्या आमदारांना तुमच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा मैत्री घडवून आणायची आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी उत्तर टाळण्याचा प्रयत्न केला. मग म्हणाले, या प्रश्नाचे मी काय उत्तर देवू ?

 

चेहर्‍यावर हलके हसू आणत मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा दिल्या आणि ते तेथून निघून गेले.
तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी या दौर्‍याची माहिती पत्रकारांना दिली. शेती – शिक्षण – आरोग्य अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोदींसोबत चर्चा झाल्याचे शिंदे म्हणाले.
लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचेही ते म्हणाले.

 

Web Title : – CM Eknath Shinde – Devendra Fadnavis | we will not break this friendship cm shinde in tweet of amruta wife of devendra fadnavis understand meaning

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा