CM Eknath Shinde | दडपणाखाली कोणीही आमच्याकडे, BJP मध्ये येऊ नका; अर्जुन खोतकरांना एकनाथ शिंदेंचा टोला

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मराठवाडा दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटात (Shinde Group) आणि भाजपात (BJP) येणाऱ्या नेत्यांना आवाहन करत अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना सणसणीत टोला लगावला आहे. अर्जुन खोतकर असू द्या किंवा मग अन्य कोणी असू द्या, तपास यंत्रणा मागे लागल्या आहेत म्हणून दडपणाखाली येऊन कोणीही आमच्याकडे, भाजपमध्ये येऊ नका, असं आवाहन करत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी खोतकरांना टोला लगावला.

 

जालन्यातील शिवसेनेचे नेते माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. संकट आलं की सेफ व्हावं लागतं, असं सूचक विधान त्यांनी केलं. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) यांची परवानगी घेऊन शिंदे गटात जात असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ईडी चौकशीचा (ED Inquiry) ससेमिरा टाळण्यासाठी खोतकरांनी शिंदे गटाची वाट धरल्याची चर्चा सुरु झाली. त्यांच्या या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाष्य करताना त्यांना टोला लगावला.

 

त्यांना कोणी बोलावलं आहे का ?

आज सकाळी खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीने धाड (ED Raid) टाकली.
त्यानंतर राऊतांनी ट्विट केलं. शिवसेना सोडणार नाही.
शिवसेना आणि महाराष्ट्र लढत राहील, असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं. यासंदर्भात शिंदे यांना प्रश्न विचारला.
यावर संजय राऊत महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत. शिवसेना सोडणार नाही असं ते म्हणाले.
पण त्यांना आणि इतर कोणी बोलावलं आहे का, असा खोचक टोला शिंदेंनी लगावला.

 

पुण्याचं काम करु नका…

आम्हाला कोणलाही दबाव टाकून पक्षात घ्यायचं नाही.
त्यामुळे तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागला आहे म्हणून कोणीही भाजप आणि आमच्याकडे येऊ नका.
पुण्याचं काम करु नका, असा टोला शिंदे यांनी अर्जुन खोतकर यांना लगावला.
अर्जुन खोतकर असू द्या किंवा मग अन्य कोणी असू द्या, तपास यंत्रणा मागे लागल्या आहेत म्हणून दडपणाखाली येऊन कोणीही आमच्याकडे, भाजपमध्ये येऊ नका, असे ते म्हणाले.

 

Web Title : – CM Eknath Shinde | dont join us or bjp to dodge ed action says cm eknath shinde on shivsena leader arjun khotkar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा