CM Eknath Shinde | दावोस दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रतिउत्तर; म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आज (दि.२१) पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या (VSI Pune) ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे यांनी दावोस दौऱ्यावर टीका करणाऱ्या राजकीय नेत्यांना चांगलेच प्रतिउत्तर दिले. ते म्हणाले की, आम्ही आकडे वाढविण्यासाठी करार केले नाहीत, मागे काय झाले, कोणाबरोबर करार झाले, या सगळ्यात मी जाणार नाही. पण राज्याच्या दृष्टीने दावोसमध्ये अतिशय महत्वाचे करार झाले आहेत. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यावेळी बोलताना म्हणाले.

तसेच यादरम्यान काहींचे करार राहिले आहेत, ते ही राज्यात येणार आहेत. त्यांना आरोप आणि टीका करण्यापलिकडे दुसरे काही काम आहे का? त्यांना टीका करायची आहे, करू दे. आम्ही त्यांना आमच्या कामातून उत्तर देवू.
असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. दावोस दौरा हा यशस्वी झाला असून, यात मोठ्या प्रमाणात राज्यात गुंतवणूक होणार आहे. ते राज्याच्या दृष्टीने हिताचे आहे. असे देखील यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे म्हणाले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची ४६ वी सर्वसाधारण सभा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आज (दि.२१) पुण्यातील मांजरी येथे पार पडली.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल शरद पवार (Sharad Pawar)
यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच शरद पवार हे प्रचंड अनुभवी नेते असून त्यांच्या या अनुभवाचा फायदा
सहकार क्षेत्रातील विकासासाठी घेणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

यादरम्यान, त्यांनी साखर उद्योगाला (Sugar Industry) चालना देण्याबरोबरच इथेनॉल उत्पादनाबाबत
देखील कारखानदारांनी सकारात्मक रहावे असे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar),
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह इतरही मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Web Title :- CM Eknath Shinde | eknath shinde comment on contracts in davos after vasant dada suger institute meet in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने; म्हणाले…

Maharashtra Politics | नक्की कोण करतयं बीडच्या राजकारणात ढवळाढवळ; चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Sachin Ahir | ‘पीएला त्यांनी जी पदं दिली, आज त्याच पदावर त्यांना समाधान मानावे लागत आहे’; ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांची विजय शिवतारे यांच्यावर टीका