CM Eknath Shinde | आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४ ते ६ जागा राखता आल्या तरी पुरेसं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – CM Eknath Shinde | लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2024) अजून दूर असली तरी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच इंडिया टुडे आणि सी-वोटरने केलेल्या सर्वेत राज्यात महाविकास (MVA) बाजी मारणार असल्याचे सांगितले आहे. जर आता लोकसभा निवडणुक घेतली गेली तर त्यात भाजपच्या (BJP) जागा कमी होतील. असं इंडिया टुडे आणि सी-वोटरच्या सर्वेत सांगण्यात आले आहे. तर राज्यात महाविकास आघाडीच्या जागा वाढून भाजपला जोरदार पीछेहाट सहन करावी लागणार असल्याचे चित्र या सर्वेत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यावर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४ ते ६ जागा राखता आल्या तरी पुरेसं आहे. असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया टुडे आणि सी-वोटरच्या सर्वेवर भाष्य केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये जे यश भाजपा आणि शिंदे गटाला मिळाले, त्याची आकडेवारी डोळ्यासमोर ठेवली असती तर अंदाजाला खरा आधार मिळाला असता. आगामी महापालिका आणि जिल्हापरिषदांच्या निवडणुका होतील, या निवडणुकीचा निकालाचा सर्व्हे हा सर्वांत मोठा असेल. जे आकडे समोर आले आहेत, ते आता निवडणुका झाल्या तर या गृहितकावर आधारित आहेत. मात्र दीड वर्षांनी निवडणुका होणार आहेत. आघाडी होणार आहे असे गृहित धरून निकालाचे अंदाज बांधने म्हणजे दिशाभूल आहे. राजकारणात दोन अधिक दोन चार कधीच होत नाही. अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केली.

तसेच यावेळी बोलताना मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणाले की, मागील अडीच वर्षात राज्यात कामच
झाले नाही. आम्ही जे काम करतोय त्यावर लोक खुश होत आहेत. लोक सुज्ञ आहेत.
त्यामुळे काम करणाऱ्यांनाच लोक पसंती देतील. असे यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

तर आगामी लोकसभा निवडणुकांवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,
‘त्यांच्या छातीत धडकी भरली आहे. त्यामुळे आपल्या पक्षातील कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नयेत.
म्हणूनच हे खटाटोप काही पक्ष करत आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत आधीचे सर्व विक्रम मोडीत निघतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात आम्हाला मोठे यश महाराष्ट्रात मिळेल.
तसेच महाविकास आघाडीला ४ ते ६ जागा राखता आल्या तरी खूप मोठी गोष्ट होईल.
असा टोला यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला लगावला.

Advt.

तर सध्याच्या ओपनिंग पोलमुळे कुणाला आनंद झाला असेल, तर त्यांनी तो आनंद जरूर घ्यावा.
त्यांचा आनंद मला हिरावून घ्यायचा नाही. आम्ही दीड वर्ष काम करत राहू. तुम्ही दीड वर्ष या ओपनिंग पोलचा
आनंद घ्या. असा टोला देखील यावेळी त्यांनी विरोधकांना लगावला.

Web Title :- CM Eknath Shinde | eknath shinde comment on upcoming 2024 general election and mahavikas aghadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CP Retesh Kumaarr | औद्योगिक कंपन्या व व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या बेकायदेशीर संघटनांवर कडक कारवाई करणार, न घाबरता तक्रार करावी; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे आवाहन

Anil Bonde | ‘जयंत पाटलांना शरद पवार हे शकूनी मामा पेक्षाही ‘पॉवरफूल’ आहेत, असे तर म्हणायचे नाही ना’, अनिल बोंडेंचा घणाघात