CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार! निवडणूक आयोगाकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अनेक निर्णयांवर जोरदार टीका केली. शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) यांच्यात यावरुन येणाऱ्या काळात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांनी शिवसेनेवर आणि नंतर धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) या चिन्हावर दावा केला आहे आहे. यावर केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) लवकरच निर्णय घेणार आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाने धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्यावे अशी मागणी आयोगाकडे केली आहे.

 

धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर
ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर होतोय अशी तक्रार करत पक्षाच्या चिन्हाचा तात्काळ निकाल लावावा अशी मागणी एकनाथ शिंदे गटाकडून (CM Eknath Shinde) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. 4 ऑक्टोबर रोजी यासंबंधी एक पत्र शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आलं आहे. तसेच धनुष्यबाण हे आम्हालाच देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

कागदपत्र निवडणूक आयोगाकडे जमा
पुढील महिन्यात अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Assembly Constituency By-Election) आम्हाला हे चिन्ह मिळावं अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. ठाकरे गटाकडून या चिन्हाचा गैरवापर करण्यात येत असून त्यासंबंधीची काही कागदपत्रं शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जमा केली आहेत. शिंदे गटाच्या या तक्रारीनंतर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे पहावं लागेल.

दोन्ही गटांचा प्लान बी तयार?
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण चिन्ह हवे आहे. पण धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं तर दोन्ही गटानं प्लॅन बी तयार ठेवलाय का? कारण काल झालेल्या दसरा मेळाव्यात दोन्ही गटाकडून पक्षचिन्ह याबाबत संकेत देण्यात आले आहेत.

 

शिंदे गटाची निशाणी ‘तलवार’ (Sword) असू शकते तर ठाकरे गटाची निशाणी ‘गदा’ Gada (Mace) हे चिन्ह असू शकते.
बुधवारी झालेल्या दसरा मेळाव्यात दोन्ही गटांनी जवळपास चिन्हांसाठी प्लॅन बी तयार केलाय की काय असं वाटत होतं.
हिंदुत्वाचे (Hindutva) विचार पुढे घेऊन निघालेल्या दोन्ही गट एकमेकांवर हल्लाबोल करण्यासाठी सज्ज झाले आहेत
आणि युद्धात लागणाऱ्या शस्त्रांचा वापर दोन्ही गट निवडणूक चिन्ह (Election Symbol) म्हणून वापरण्याची शक्यता आहे.
बीकेसीमध्ये तलवारीचे पुजन करण्यात आले तर दुसरीकडे विरोधकांवर शिवतिर्तावर देखील शस्त्रपुजन करण्यात आले.
मात्र प्रतिस्पर्ध्यावर हल्लाबोल करताना गदा या शब्दाचा वारंवार उल्लेख करण्यात आला.

 

Web Title :- CM Eknath Shinde | eknath shinde complaint to election commission of india on shivsena dhanushyaban and uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Registration and Stamp Duty Dept | तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीबाबतचा अहवाल महसूल सचिवांकडे सादर

Nana Patole | ज्यांना स्वतःचा पक्ष नाही त्यांनी काँग्रेसवर बोलणे हास्यास्पद, नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना टोला

Kolhapur ACB Trap | 3 हजारांची लाच घेताना सहाय्यक लेखाधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात