CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर टीका, ”सरकार बदलल्यावर काय काय अडचणी येतात आणि…”

मुंबई : CM Eknath Shinde | कोका-कोला कंपनीची (Coca-Cola Company) २०१५ मध्ये येथे येण्याची इच्छा होती. त्यावेळी आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अमेरिका दौऱ्यात असताना याबाबत ठरलेही होते. परंतु नंतर नवीन सरकार आले. त्या सरकारबद्दल मी काही सांगत नाही. सरकार बदलल्यावर काय काय अडचणी येतात आणि त्याचे कारण काय यावर मी बोलणार नाही, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत कोका-कोला कंपनीच्या प्रकल्पाचे स्वागत केले. यावेळी ते बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, कोका-कोलाची देशात ६० उत्पादने आहेत. तेथे हजारो कर्मचारी काम करतात. कंपनीने २०२३ मध्ये भारतात १२ हजार ८४० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. कोका-कोला कंपनी रत्नागिरीत उभी राहत असल्याने रोजगार उपलब्ध होईल. सरकारची स्थानिकांना रोजगार देण्याची भूमिका आहे. व्यवस्थापनानेही स्थानिकांना प्राधान्य द्यावे.

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, खरे म्हणजे कोकणात जेवढे काम करता येईल तेवढे केले पाहिजे होते.
कारण कोकणाने नेहमीच बाळासाहेब ठाकरेंवर (Balasaheb Thackeray) प्रेम केले आहे. आमच्या सगळ्यांवर प्रेम केले आहे.
फक्त राजकारणासाठी कोकणी माणसाला वापरून घेण्याचे काम आमचे सरकार करणार नाही.

शिंदे म्हणाले, भूमीपुत्रांना मोठमोठी स्वप्ने दाखवायची, कौतुक करायचे आणि चांगला प्रकल्प आल्यावर विरोध
करायला लावायचा, असे राजकारण आम्ही केले नाही. बाळासाहेबांनी आणि आनंद दिघेंनी ते कधी शिकवले नाही.
ज्यांनी हे केले त्यांच्यामुळे प्रकल्प उशिरा सुरू होत आहे. आपले सरकार आल्यावर तात्काळ जे जे उद्योग महाराष्ट्रात
येऊ इच्छितात त्यांना रेड कार्पेटचे आदेश दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every updateहे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | मारहाण करुन नग्नावस्थेत सोडलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू; म्हाळुंगे परिसरातील घटना

Pune Police MCOCA Action | पीएमपी चालकाचा खून करणाऱ्या सोमनाथ कुंभार व त्याच्या साथीदारावर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 92 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA