CM Eknath Shinde | दावोसमध्ये देखील मोदींचे भक्त; ‘मला म्हणाले तुम्ही…’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन तसेच लोकार्पण आज (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi In Mumbai) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानत त्यांची स्तुती केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे नुकतेच दावोस दौऱ्यावरून परतले आहेत. त्यावेळी तेथे घडलेला एक प्रसंग त्यांनी यावेळी सांगितला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोसमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणीही मोदींचीच हवा होती, अनेक देशाच्या पंतप्रधानांनी फक्त मोदींबद्दलच विचारलं. दावोसमध्येही मोदींचे भक्त असल्याचं मला जाणवलं. येत्या काळात मोदींच्या नेतृत्वाखाली मुंबईचा चेहरामोहरा बदलून टाकणार असा विश्वास देखील यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

 

यावर पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दावोसमध्ये गेल्यानंतर तेथे अनेक देशांचे पंतप्रधान भेटले, अधिकारी भेटले. त्याठिकाणीही मोदींचे भक्त होते. त्यांनी मला विचारले की तुम्ही मोदींसोबत आहात का? त्यावेळी मी म्हणालो की मी त्यांचाच माणूस आहे. असेही यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, ‘महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचा विकास किती झाला ते आपल्याला माहित आहे. अगदी ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी आणि लोक उपयोगी कामांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्याची संधी आम्हाला मिळाली ती केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच. अशी स्तुती देखील यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केली.

मोदींचे व्यक्तीमत्व हे प्रचंड उर्जादायी आहे की जे आपल्याला ऊर्जा देतं.
येत्या दोन अडीच वर्षामध्ये या मुंबईचा कायापालट झालेला आपल्याला पहायला मिळेल.
२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मेट्रोचे भूमीपूजन केले होते.
आणि आज त्यांच्याच हातातून या प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. हा दैवी योग आहे.
मी पंतप्रधानांचे त्याबद्दल आभार मानतो. असेही यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

दरम्यान, पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)
हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात मेट्रोच्या साडेतीनशे किलोमीटर जाळ्याची सुरूवात झाली.
मधल्या काळात यावर काही काम झालं नाही. आता आमचं सरकार आल्यानंतर त्या कामाला पुनश्च चालना मिळाली.
तसेच दरवर्षी खड्ड्यात जाणारा मुंबईकरांचा पैसा आता आम्ही वाचविणार असून मुंबईतील ४०० किमी रस्त्याचे आता
काँक्रीटीकरण होणार आहे. असंही यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

Web Title :- CM Eknath Shinde | eknath shinde on pm narendra modi mumbai visit davos g20 visit mumbai metro

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prisoners Release | प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील 189 कैद्यांना विशेष माफी, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

Michael Bracewell | ब्रेसवेलने केली धोनीच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील दुसरा खेळाडू

Maharashtra Politics | बहुमत राष्ट्रवादीला; सूत्रे मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हाती…