CM Eknath Shinde | शिवसेनेच्या 2 आमदारांना लागली लॉटरी, बंडखोरीनंतर मंत्रिपद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | शिवसेनेत (Shivsena) असताना मंत्रीपदाची संधी हुकलेल्या दोन नवीन चेहर्‍यांना शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात (Shinde-Fadnavis Government Cabinet) स्थान देण्यात आले आहे. तानाजी सावंत आणि दिपक केसरकर (Tanaji Sawant and Deepak Kesarkar) यांना शिंदे गटाकडून पहिल्या यादीत स्थान देण्यात आले आहे. राज्याच्या मंत्रीमंडळातील नव्या नावांची यादी समोर आली आहे. शिंदे गटाकडून (CM Eknath Shinde Group) सावंत आणि केसरकर यांना संधी देण्यात आली आहे. (CM Eknath Shinde)

 

तानाजी सावंत हे बंडखोरीमध्ये पहिल्या फळीतील नेते होते. आपली नाराजी त्यांनी जाहीरपणे सभांमध्ये बोलून दाखवली होती. तसेच, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) शपथविधी सोहळ्यात ऐनवेळी त्यांचे नाव कापल्याने ते नाराज होते. तर, दुसरीकडे दीपक केसरकर यांनाही मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने तेही शिवसेना नेतृत्त्वावर नाराज होते. या दोघांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पहिल्या टप्प्यात मंत्रिपद देऊन खुश केले आहे.

 

मागील सरकारमध्ये गृह राज्यमंत्री (Minister of State for Home) असूनही केसरकर यांना मविआमध्ये संधी दिली नव्हती. अखेर बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाकडून या 2 आमदारांना मंत्री बनविण्यात आले आहे. शिंदे गटाकडून 9 जणांना मंत्रीपद (Ministership) देण्यात आले आहे. (CM Eknath Shinde)

 

शिंदे गटाकडून पहिल्या टप्प्यात यांना संधी

1. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)

2. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)

3. तानाजी सावंत

4. दीपक केसरकर

5. संदीपान भुमरे (Sandipan Bhumre)

6. अब्दुल सत्तार (Abdul Sattar)

7. दादा भुसे (Dada Bhuse)

8. उदय सामंत (Uday Samant)

9. संजय राठोड (Sanjay Rathod)

 

भाजपाकडून (BJP) पहिल्या टप्प्यात यांना संधी

1. गिरीश महाजन (Girish Mahajan)

2. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)

3. मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha)

4. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)

5. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)

6. सुरेश खाडे (Suresh Khade)

7. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)

8. अतुल सावे (Atul Save)

9. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)

 

Web Title :- CM Eknath Shinde | eknath shinde two shiv sena mlas get lottery shinde faction gets ministerial post after rebellion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP | विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात घरातून प्रोत्साहन दिले पाहिजे – दिलीप वळसे पाटील

 

Builder Mangal Prabhat Lodha | बांधकाम व्यावसायिक शिंदे सरकारचे बनले मंत्री

 

Pune Crime | ७ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न; चिमुरडीने युक्तीने करुन घेतली स्वत:ची सुटका