×
Homeताज्या बातम्याCM Eknath Shinde | अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर आणखी एका नेत्याचा खळबळजनक...

CM Eknath Shinde | अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर आणखी एका नेत्याचा खळबळजनक दावा, एकनाथ शिंदे 15 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना-भाजप युती (Shivsena-BJP Alliance) असताना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह असलेल्या एका शिष्टमंडळाने काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shivsena) अशी सत्तास्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Former CM Ashok Chavan) यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याला आता शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Former MP Chandrakant Khaire) यांनी दुजोरा दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) मुख्यमंत्री असतांना आम्हाला काँग्रेसमध्ये यायचं असल्याचं म्हणत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागे लागले होते, असा खळबळजनक दावा खैरे यांनी केला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे ?

अशोक चव्हाण यांच्या गौप्यस्फोटानंतर चंद्रकांत खैरे यांनी आणखी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, शिवसेनेच्या 15 आमदारांना (MLA) घेऊन एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) काँग्रेसमध्ये जाणार होते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांच्या समवेत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते शक्य झालं नाही, असं खैरे यांनी सांगितलं.

खैरे पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांबाबत शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींना समजलं, त्यानंतर शिंदे यांनी माघार घेतली. जे आज आम्हाला सांगत आहेत काँग्रेससोबत गेले. परंतु आज गद्दारी करणारे एकनाथ शिंदे स्वत: काँग्रेससोबत जाणार होते त्याचे काय? शिंदे यांनी देवीच्या साक्षीने खरे सांगावे असे आव्हान खैरे यांनी दिले आहे.
शिंदे किती वेळा खोटं बोलून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आरोप करणार आहेत?
आई जगदंबा त्यांना कधीही माफ करणार नाही. आज हे खोके कुठून आणले, कसे आणले? 10 हजार बसेस मेळाव्याला पाठवणार आहेत. शिवसेनेशी जिद्द करणं तुम्हाला भारी पडेल असा इशाराही त्यांनी दिला.

मला संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी एकदा सांगितले होते.
काँग्रेससोबत शिवसेना गेल्यावर तुम्हीही मंत्रिमंडळात (Cabinet) होता.
सगळ्यात मोठं खातं तुमच्याकडे दिले होते. मग इतकं असताना तुम्ही दोष देता.
अडीच वर्षापूर्वी म्हणायला हवं मी काँग्रेससोबत जाणार नाही.
मी बाहेर पडतो पण तेव्हा म्हटलं नाही असेही खैरे म्हणाले.
आताची बंडखोरी हिंदुत्वासाठी (Hindutva) नाही तर खुर्चीसाठी होती.
शिंदेंना खुर्ची हवी होती असा आरोप खैरेंनी केला .

दसरा मेळावा बाबत (Dasara Melava 2022) बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले,
दसरा मेळाव्याला किती गर्दी जमणार याचा आकडा सांगणार नाही.
दरवर्षी मेळाव्याला आपापल्या सोयीने जातात. भाकरी घेऊन शिवसैनिक मेळाव्याला येतात.
आमच्याकडे खोके संस्कृती नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Web Title :- CM Eknath Shinde | eknath shinde was going to congress with 15 mlas another big claim by shivsena chandrakant khaire

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | सराईत गुन्हेगार तुषार हंबीर याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये हल्ला करणाऱ्या नोन्या वाघमारे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 97 वी कारवाई

Shivsena | कमळाबाई आणि ‘मिंधे’ गट म्हणत शिवसेनेची खरमरीत टीका, राजकीय स्वार्थासाठी घटनात्मक संस्थांना राजकीय अड्डे…

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News