CM Eknath Shinde | ‘अनाथांचे नाथ एकनाथ, तुम्ही दयाळू आहात’, पोलीस निरीक्षकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली ‘ही’ मागणी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात (Dhule Police Training Centre) कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र पाठवून (Police Inspector Letter) पोलिसांना दिवाळी बोनस (Diwali Bonus) देण्याची मागणी केली आहे. या पोलीस निरीक्षकांनी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार (Monthly Salary) देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री तुम्हाला सगळे अनाथांचा नाथ एकनाथ म्हणतात. तुम्ही दयाळू आहात. त्यामुळे पोलिसांच्या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष द्या, अशी विनंती या पत्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकांनी हे पत्र मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्री कार्यालय (Home Minister), अर्थमंत्री कार्यालय (Finance Minister) आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या कार्यालयाला (DGP Office) पाठवले आहे.

 

पोलीस निरीक्षक आर आर चव्हाण (Police Inspector RR Chavan यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(CM Eknath Shinde) यांना पत्र लिहलं आहे.
या पत्रात पोलीस निरीक्षक चव्हाण म्हणतात, पोलिसांचे प्रश्न मांडण्यासाठी कोणतीही संघटना नाही.
त्यामुळे पोलिसांना कोणी वाली नाही. परिणामी सरकार दरबारी पोलिसांच्या प्रश्नांची, समस्यांची दखल घेतली जात नाही. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर तडजोड करण्याची सवय असते. तशीच तडजोड करुन फक्त एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.

सध्या महाराष्ट्रातील जनता म्हणते की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दयाळू,
अनाथांचा नाथ एकनाथ आहेत. तसेच माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) साहेब
देखील पोलिसांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष देतात. त्यामुळे आम्हा पोलिसांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडून 76 दिवस 12 ते 15 तास जास्तीचे कर्तव्य केल्यामुळे मोबदल्यात दया दाखवून देशातील इतर राज्यांप्रमाणे एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून देण्याची कृपा करावी अशी अपेक्षा आहे, असं चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

याशिवाय पोलीस वगळून इतर शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असतो.
एका वर्षात 52 शनिवार येतात. तसेच पोलीस वगळून इतर शासकीय कर्मचाऱ्यांना 24 पगारी सुट्ट्या मिळतात.
असे वर्षातील 52+24=76 असे 76 दिवस पोलिसांना 12 ते 15 तास जास्त काम करावे लागते.
त्यामुळे तुम्ही दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार वाढवून द्या, असे पोलीस निरीक्षक आर आर चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.

Web Title :- CM Eknath Shinde | give one months salary to police as diwali bonus police inspectors letter to cm eknath shinde and hm devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | शिवसेनेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चुकीचा संदेश, फेरविचार करावा’; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मत

Vijay Rupani | भाजपा हायकमांडच्या फोनबाबत विजय रुपानी यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले – रात्री फोन आला आणि सकाळी….