CM Eknath Shinde | एसटी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (State Road Transport Corporation) अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात वाढ (Dearness Allowance) करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांनी मान्यता दिली आहे. महामंडळाचे सुमारे 92 हजार अधिकारी-कर्मचारी असून त्यांना पूर्वी मिळणारा 28 टक्के महागाई भत्ता आता 34 टक्के दराने मिळणार आहे. सुमारे 15 कोटी रुपयांची मासिक वाढ वेतनखर्चात होणार आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या सन 2016-17 ते 2021-22 या सहा वर्षांसाठीच्या वेतनसुधारणेच्या प्रस्तावास देखील यावेळी मंजुरी देण्यात आली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाची बैठकी झाली.

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची 302 वी बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नैनोटिया (Principal Secretary Parag Jain- Nainutia), महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्ने (Managing Director Shekhar Chenne), कामगार आयुक्त सुरेश जाधव (Labor Commissioner Suresh Jadhav), परिवहन आयुक्त विवेक भीमनवार (Transport Commissioner Vivek Bhimanwar) यांचेसह एसटी महामंडळ, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

 

एसटीच्या ताफ्यात 5 हजार इलेक्ट्रिक आणि 2 हजार डिझेल बसगाड्या
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्याशिवाय डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्या-टप्प्याने ‘एलएनजी’ (LNG) मध्ये रुपांतर करण्यास आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंजुरी दिली. दरम्यान, महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक असून स्वच्छता-टापटीपपणा ठेवून गाड्यांची निगा राखा आणि राज्यातील जनतेला दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आज दिले.

वातानुकूलित बसेस पेक्षा तिकिटदर कमी ठेवा
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत, यापूर्वीच्या बैठकीत मान्यता मिळालेल्या दोन हजार बसेस घेण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यामध्ये वाढ करून 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्यता दिली. या बसगाड्या घेण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बॅंकेकडून (Asian Development Bank) कर्ज घेण्यासही मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. इलेक्ट्रिक बसेस (Electric Buses) या वातानुकुलित असल्याने त्याचे सध्याच्या वातानुकूलित बसेस पेक्षा तिकिटदर कमी ठेवून सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.

2 हजार डिझेल बसेस
सीएनजी (CNG) बसेससाठी चेसिस उपलब्ध होत नसल्याने आणि सीएनजी पंपांची कमी संख्या पाहता
सीएनजीऐवजी दोन हजार डिझेल बसगाड्या एसटीच्या ताफ्यात घेण्यास आणि पुणे व
सांगली विभागाकरिता 180 बसगाड्या भाडेतत्वावर घेण्यासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

 

डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे ‘एलएनजी’ मध्ये रूपांतर होणार
डिझेलवर धावणाऱ्या पाच हजार बसगाड्यांचे लिक्विफाईड नॅचरल गॅस (एलएनजी) इंधनामध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे.
यामुळे डिझेलच्या प्रचलित दरापेक्षा 20 ते 25 टक्के कमी दराने एलएनजीचा पुरवठा होणार आहे.
शिवाय संपूर्ण बस वातानुकुलित असल्याने कमी पैशांमध्ये प्रवाशांना प्रवास करता येईल.
हे काम पुरवठादार कंपनीकडून करण्यात येणार असून सुरुवातीला यात महामंडळाला
कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title :- CM Eknath Shinde | good news for st officers employees chief minister gives green light to increase inflation allowance rate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MSEDCL | वीजबिल भरण्याबाबत बनावट संदेशाद्वारे आर्थिक फसवणूकीचे प्रकार वाढले; महावितरणने केले ‘हे’ आवाहन

Aaditya Thackeray | ‘मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी नाही, आमच्यासाठी जन्मभूमी कर्मभूमी आहे’ – आदित्य ठाकरे

Devendra Fadnavis | “अगर ऐसे ही सिलेक्टीव्ह चीज़े पढ़ते रहोगे तो… “; ट्विट करून घेतला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींचा धडा