CM Eknath Shinde | अपक्ष आमदारांनी साथ सोडली तरी 55 पैकी 40 आमदार आमच्यासोबत : एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली आपली ताकद

मुंबई : CM Eknath Shinde | लोकशाहीत संविधान, कायदा असतो. त्यानुसारच सर्व होत असते. बहुमतालाही महत्त्व असून आमच्याकडे 55 पैकी 40 आमदार आहेत. 10 अपक्ष आमदार (Independent MLA) आहेत. अपक्ष आमदारांनी साथ सोडली तरी 55 पैकी 40 आमदार आमच्यासोबत आहेत. 18 पैकी 12 खासदार (MP) आमच्याकडे आहेत. देशातील 40 राज्यांचे प्रमुख आमच्यासोबत आहेत. लाखो लोक आमच्यासोबत आहेत. आम्हाला स्पष्ट बहुमत आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिंदे गटाची (Shinde Group) ताकद स्पष्ट केली, ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

आगामी महापालिका निवडणुकांबाबत (Municipal Elections) ते म्हणाले, आम्ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (Mumbai Municipal Elections) भाजपसोबत (BJP) एकत्रच लढणार आहोत. आमची नैसर्गिक युती आहे. शिवसेना भाजपाचे सरकार (Shivsena BJP Government) राज्यात काम करत आहे. येत्या निवडणुकांमध्येही एकत्रच लढणार आहोत.

दसरा मेळाव्याची (Dasra Melava 2022) माहिती देताना शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, रॅलीची मी तयारी पाहून आलो आहे. मोठ्या उत्साहात ही तयारी सुरू आहे.
हजारो लाखोंच्या संख्येने या ठिकाणी लोक येतील. त्यांना कोणतीही समस्या येऊ नको, ते सहजरित्या येऊन जावेत यासाठी काम सुरू आहे.
ही रॅली यशस्वी ठरणार आहे.

शिंदे म्हणाले, मैदान कोणतेही असो विचार महत्त्वाचे आहेत.
आम्ही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार पुढे नेत आहोत.
त्यांची भूमिका घेऊन पुढे जात आहोत.
यासाठी आम्हाला लोकांचे समर्थन मिळत आहे.
मी ज्या ज्या ठिकाणी जातो, तेथील लोकांच्या भावना पाहून कल्पना येते.
आम्ही काम करणारे लोक आहोत. लोक नक्की येणार.
ही काम करणारी माणसं आहेत आणि जे विचार हे मांडतात तेच हे करतात याची लोकांना कल्पना आहे.
जी आपली व्यक्ती आहे, त्यासाठी आम्ही काम करत आहोत.

Web Title :-  CM Eknath Shinde | i am balasaheb thackeray s shiv sainik one battle won we will win again eknath shinde spacial maharashtra bmc elections

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police | पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारकडून ‘दसऱ्या’ची भेट, नैमित्तिक रजेत भरघोस वाढ; जीआर निघाला

Chandrakant Patil | ‘नाथाभाऊंचे जाणे दु:खद होते, पण आता…’, एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट सांगतिलं