CM Eknath Shinde | 350 कोटी लुटून कोणाच्या घशात घातलेले नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार प्रहार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मागील अनेक दिवस महाविकास आघाडीचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर नागपूरच्या न्यास विक्री प्रकरणात गैरव्यवहार केल्याचे आरोप करत आहेत. त्यावर आज (दि. 20) हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session 2022) दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर न्यास प्रकरणात (Nagpur Land Case) मी नगरविकास मंत्री किंवा मुख्यमंत्री असताना कोणताही घोटाळा केलेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणात विधान परिषदेत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची (Resignation) मागणी केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार हल्ला चढवला. मख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी पक्षाने हे प्रकरण जर न्यायप्रविष्ट होते, तर उपमुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत उत्तर का दिले, असा प्रश्न विरोधकांनी केला. त्यानंतर सभागृहात बोलू दिले जात नसल्याचे सांगत विरोधकांनी सभात्याग केला.

 

आपल्यावरील आरोप फेटाळताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
मी नागपूर न्यास घोटाळा नगरविकास मंत्री किंवा मुख्यमंत्री असताना केला नाही. काल विरोधकांच्या अनेक बैठका झाल्या.
या बैठकीत एकनाथ शिंदे सापडला आहे, त्याला धरा असा निर्णय झाला.
तशी माझ्याकडे माहिती असल्याचा दावा त्यांनी केला.
मात्र ज्यांनी हे प्रकरण काढले त्यांच्याकडे या प्रकरणाची संपूर्ण माहिती देखील नाही.
आम्ही तुमच्यासारखे नसून, बांधकाम व्यावसायीकाडून 350 कोटी आम्ही लुटून कोणाच्या घशात घातलेले नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

 

Web Title :- CM Eknath Shinde | maharashtra assembly winter session cm eknath shinde denies allegations of nagpur na land scam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Congress | हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरल ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे अनोखे आंदोलन

Love Jihad Law | महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद कायदा’ होणार? देवेंद्र फडणवीसांचे सभागृहात मोठे विधान

Winter Session 2022 | ठाकरे गटाला आणखी एक धक्का! विधानसभेच्या तालिका सभाध्यक्षांच्या यादीतून केले बेदखल…