CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ मागणीला योगी आदित्यनाथ यांची तत्वत: मान्यता, दिले अयोध्या भेटीचे आमंत्रण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अयोध्येमध्ये ‘महाराष्ट्र भवन’ (Maharashtra Bhavan) उभारण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) यांच्याकडे जागेची मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ही मागणी योगी आदित्यनाथ यांनी मान्य केली आहे. त्यामुळे अयोध्येमध्ये (Ayodhya) ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बुधवारी (दि.4) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे देखील उपस्थित होते. योगी आदित्यनाथ सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राजभवन येथे स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

राजभवन येथे झालेल्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे अयोध्येत ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी केली. या मागणीला योगी आदित्यनाथ यांनी तत्वत: मंजुरी दिली आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण लवकरच प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर
येणार असल्याचेही योगी आदित्यनाथ यांना सांगितले. त्यावर समाधान व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे
यांना अयोध्या भेटीचे आमंत्रण दिले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री राम नाईक
(Former Union Minister Ram Naik), खासदार रवी किशन (MP Ravi Kishan) हे उपस्थित होते.

Web Title :- CM Eknath Shinde | maharashtra bhavan stand in ayodhya yogi aadityanath approves cm shinde demand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mhada Lottery 2023 | आता म्हाडाचे घर घेणं झालं सोप्प! २१ नाही तर लागणार फक्त एवढीचं कागदपत्रे…

Hypersomnia Symptoms | ८ तास झोपल्यानंतर सुद्धा दिवसा का येते झोप, जांभईपासून अशी होईल सुटका