CM Eknath Shinde | पेट्रोल डिझेल स्वस्त होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोलवरील व्हॅट (VAT on Petrol) कमी करण्याचा निर्णय नव्याने सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) घेणार असल्याची मोठी घोषणा नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. बहुमत चाचणीत (Majority Test) शिंदे सरकार उत्तीर्ण झाल्यानंतर अभिनंदन प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. केंद्रानंतर काही राज्यांनी व्हॅट कमी केला होता, पण महाराष्ट्राने केला नव्हता. आता नवं सरकार लवकरात लवकर तो निर्णय घेईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.

 

यापूर्वी केंद्र सरकारनं (Central Government) पेट्रोल डिझेलवरील कर कपात (Petrol Diesel Tax Deduction) करुन जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता.
त्यानंतर अनेक राज्यांनी पेट्रोल डिझेलवरील कर कमी केले होते. परंतु महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra)
पेट्रोल डिझेलवरील आपले कर कमी केले नव्हते.
त्यामुळे राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर अधिकच होते.
दरम्यान, आता महाराष्ट्रातील सरकारनं पेट्रोल डिझेलवर लवकरच कर कपात करणार असल्याची माहिती दिली.
लवकरच यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार असून राज्यातील जनतेला दिलासा देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.

दिवाळीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पेट्रोल, डिझेलवरील अबकारी कर कमी केला होता.
मात्र, ठाकरे सरकारने आम्हाला जीएसटी (GST) परतावा दिलेला नाही,
यामुळे पेट्रोल, डिझेलवरील कर कमी होणार नाही, अशा शब्दांत कर कपात फेटाळली होती.
त्यामुळे इतर राज्यांत 15-20 रुपयांनी इंधनाचे दर कमी झाले तरी राज्यात मात्र केंद्राच्याच दर कपातीवर समाधान मानावे लागले होते.
पुन्हा दोन महिन्यापूर्वी केंद्र सरकारने अबकारी कर कमी केला,
तेव्हा देखील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Former Deputy CM Ajit Pawar) यांनी राज्यात व्हॅट कपात करण्यास नकार दिला होता.

 

Web Title :-  CM Eknath Shinde | maharashtra cm eknath shinde big annoucement government will reduce vat on petrol diesel

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा