CM Eknath Shinde | विधानसभेत CM एकनाथ शिंदे भावूक, झाले अश्रू अनावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | आज विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Government) विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मनोगत मांडले. यावेळी त्यांनी शिवसेना संघटना वाढवण्यासाठी केलेले कार्य तसेच बंडखोरीची वेळ का आली, इत्यादी खुलासे त्यांनी केले. आपल्या भाषणात कौटुंबाचा उल्लेख आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचे डोळे पाणावले. दोन मुलांच्या अपघाती मृत्यू झाल्याचे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. (CM Eknath Shinde)

 

पानावलेल्या डोळ्यांनी मुख्यमंत्री म्हणाले, माझी दोन मुले मरण पावली तेव्हा मी ठरवले की कुटुंबाची आवस्था खुपच बिकट आहे, आता त्यांना माझ्या आधाराची गरज आहे. राजकारणातून बाहेर पडून मी त्यांना आधार देण्याचे ठरवले. पण त्यावेळी आनंद दिघे (Anand Dighe) यांनी मला समजावले. तेव्हा वाटायचे कुणासाठी जगायचे, कुटुंबासोबत राहीन. आज बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने सरकार स्थापन केले आहे, असे सांगताना एकनाथ शिंदे यांना अश्रू अनावर झाले. (CM Eknath Shinde)

 

मुख्यंत्री शिंदे म्हणाले, संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी काम केले. सतत समाज कार्यात असल्यामुळे कुटुंबाला वेळ देता आला नाही. परंतु, मुलांचा मृत्यू झाला त्यावेळी सर्व काही संपले असे वाटत होते. माझी दोन मुले माझ्या डोळ्यासोरून गेली. माझे कुटुंब उधवस्त झाले होते.

 

यानंतर मी ठरवले की आता सर्व सोडून कुटुंबासाठी वेळ द्यायचा.
यापुढे फक्त माझा मुलगा, माझी पत्नी आणि आई-वडिलांसाठी जगायचे. त्यावेळी मी कोलमडून पडलो होतो.
त्याचवेळी आनंद दिघे यांनी मला आधार देत पुन्हा राजकारणात आणले. त्यांच्याच आशीर्वादाने आज मी मुख्यमंत्री झालो आहे.

 

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, आनंद दिघे पाच वेळा घरी आले. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, आता काम करू शकणार नाही.
पण, आनंद दिघे म्हणाले, तूला दुसर्‍यांचे अश्रू पुसायचे आहेत. त्यावेळी आनंद दिघे यांनी माझी काळजी घेतली.
मला आधार दिला, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

Web Title :- CM Eknath Shinde | maharashtra cm eknath shinde breaks down as he remembers his family in assembly

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC Water Supply | एक दिवसाआड पाणी पुरवठ्याबाबत पहिल्या दिवशी शहरातून एकही ‘तक्रार नाही’ ! 11 जुलैनंतर ‘वेळापत्रका’ची फेररचना

 

CM Eknath Shinde | विधान परिषद निवडणुकीदरम्यान असं काय घडलं? आमदार सोबत कसे आले? – एकनाथ शिंदे

 

Service Charge in Hotels and Restaurants | केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! हॉटेल, रेस्टॉरंटमधील सक्तीच्या सेवा शुल्क वसुलीवर बंदी