CM Eknath Shinde | …तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरू शकतात ‘या’ ठिकाणी जाणारे पहिलेच मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – १४ जानेवारीला ऐतिहासिक पानिपत शौर्यदिन आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. यावेळी हरियाणा मधील पानिपत मध्ये मराठ्यांच्या शौर्याचा जागर करण्यात येणार आहे. शौर्य स्मारक समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी हरियाणा राज्याचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), हरियाणाचे मुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्यासह केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, विनोद तावडे, राहूल शेवाळे यांना आमंत्रण देण्यात आले आहे. असे संयोजकांनी दिलेल्या माहितीतून समजले. (CM Eknath Shinde)

१७६१ मध्ये पानिपतमध्ये झालेल्या लढाईचा शौर्य दिवस गेल्या काही वर्षांपासून साजरा केला जात आहे. पानिपतमधील काला आम या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या वर्षाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित राहिले तर हे महाराष्ट्राचे पहिलेच मुख्यमंत्री ठरतील. याआधी प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना शौर्यदिनाच्या कार्यक्रमला हजर राहिल्या होत्या. (CM Eknath Shinde)

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना या कार्यक्रमाचे संयोजक प्रदिप पाटील म्हणाले की, महाराष्ट्र आणि पानिपतचं नातं अतिशय जवळचं आहे. १७६१ ला पानिपतचं तिसरं युद्ध झालं. त्या युद्धात महाराष्ट्रातले लाखो सैनिक शहीद झाले. आणि असं म्हणतात की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातली बांगडी फुटली. त्या युद्धात वीरमरण आलेल्या मराठे हिंदुस्तानच्या सीमेसाठी लढले होते. १७६१ ला जे युद्ध झालं त्याची २६२ वी वर्षपूर्ती १४ जानेवारी २०२३ रोजी होत आहे. या कार्यक्रमाला प्रथमच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत. असे यावेळी बोलताना प्रदिप पाटील म्हणाले.

तसेच या कार्यक्रमाला राज्यपाल बंडारु दत्तात्रय आणि हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हजर राहणार आहेत.
२०१२ मध्ये या कार्यक्रमाला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आल्या होत्या.
आतापर्यंत खेद होता की महाराष्ट्राचे कोणतेही मुख्यमंत्री आतापर्यंत इथे आले नव्हते.
मात्र एकनाथ शिंदे यांनी धाडस करुन देशासाठी बलिदान केलं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी येत आहेत.
महाराष्ट्रातून दोन हजार जण येत आहेत. रेल्वे मंत्रालयाने पाच ते सहा ट्रेनला एक्स्ट्रा कोच लावले आहेत.
दिल्लीतील यूपीएससीतील ६०० ते ७०० मुलं आणि इतर वर्गातील असे मिळून हजार ते दीड हजार मुलं येणार आहेत.
तर पानिपतच्या भूमीवर १५ ते २० हजार लोक जमा होतील. असा विश्वास प्रदिप पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Web Title :-  CM Eknath Shinde | maharashtra cm eknath shinde is likely to go to panipat on january 14 an invitation to the shaurya day program

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Farhan Akhtar – Shraddha Kapoor | घटस्फोटानंतर अभिनेता फरहान अख्तर होता ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात; ‘हे’ ठरलं ब्रेकअपच कारण

Vaani Kapoor | पुन्हा एकदा वाणी कपूरच्या बोल्ड अवताराने वाढवले सोशल मीडियाचे तापमान