CM Eknath Shinde | ‘विरोधक कितीही एकत्र आले तरी मोदी सर्वांवर भारी’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजप सरकार (BJP Government) विरोधात देशातील विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी नुकतीच ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्री येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Maan) हे उपस्थित होते. या भेटीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. रत्नागिरी येथे ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aplya Dari) उपक्रमाच्या कार्य़क्रमानंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

 

https://twitter.com/mieknathshinde/status/1661652111959150594?s=20

 

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, यापूर्वीही सगळे विरोधी पक्ष एकत्र आले होते. लोकशाहीत सर्वांना भेटण्याचा, एकत्र येण्याचा अधिकार आहे. मात्र शेवटी मतदान जनता करत असते. गेल्या वेळचा अनुभव आपल्याकडे आहे. 2014 पेक्षा 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखाली अधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळचा माहोल आपण सर्वांनी पाहिला आहे. हे सगळे पालापाचोळ्यासारखे उडून गेले आणि मोदींच्या नेतृत्वाखाली बहुमत आलं. त्यांच काम बोलतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

 

मोदी सर्वांवर भारी

विरोधकांवर हल्लाबोल करताना एकनाथ शिंदे म्हणाले, हे कितीही एकत्र आले तरी एकटे मोदी सर्वांवर भारी आहेत. त्यांच्या कामामुळे ते भारी आहेत. संपूर्ण जगात देशाचं नाव मोठ करण्याचं काम मोदींनी केलं आहे. जगातील इतर देशांची अर्थव्यवस्था (Economy) डबघाईला आली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणण्याचं काम मोदींनी केलं आहे. भारत हा आता पुढे जात आहे, महासत्तेकडे जात आहे. याचीच पोटदुखी सुरु आहे. याचा जनतेच्या मनावर परिणाम होत नाही.
जेवढं मोदींच्या विरोधात बोलतील, विरोधी पक्ष एकत्र येतील तेवढी जनता त्यांना त्यांची जागा 2024 मध्ये ताकदीनं दाखवतील,
असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

 

प्रत्यक्ष नाही तर बोर्डावर तरी…

नाना पटोलेंचा (Nana Patole) भावी मुख्यमंत्री असा बॅनर लागला आहे असा प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले, हे चांगलंच आहे,
प्रत्यक्ष नाही तर बोर्ड तर लागतो. त्यांच्यात चढाओढ सुरु आहे. त्यांना आनंद घेऊ द्या. एक उमेदवार आधी निश्चित केला पाहिजे.
उमेदवारांपासूनच मारामारी आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे.
अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government)
घरी झोपलं होतं, घरी बसलं होतं, मग जनता कोणाच्या बाजून उभी राहील, असं शिंदे म्हणाले.

 

 

 

Web Title :  CM Eknath Shinde | maharashtra cm eknath shinde praises
pm narendra modi over work will won lok sabha 2024

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा